विश्रांतीनंतर मुंबई,ठाण्यासह राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक;राज्यात कुठे पाऊस अन् कुठे यलो अलर्ट?

राज्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती.त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातही शेतीच्या कामांसाठी सगळेचजण आतुरतेने पावसाची वाट पाहत होते.त्यानंतर अखेर शुक्रवार १७ जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं आहे. आज शनिवारी देखील (१८ जुलै २०२६) अनेकांना पावसाने दिलासा दिला आहे. राज्यातील इतर शहरांप्रमाणेच मुंबई, ठाणे, बीड, सोलापूर, अंबरनाथ, बदलापूर भागात पावसाने हजेरी लावली.विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरीला लावल्याने राज्यासहित मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाने आज अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, मुंबई-कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला गती मिळाली आहे. मात्र, मोठ्या पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल असं म्हटलं जात आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस अजून पोहोचला नसला तरी आज बहुतांश भागात मुसळधार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जोरदार वारा, विजांसह वादळी पावसाची शक्यता

मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. दरम्यान मुंबई-कोकण वगळता आज उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी आज जोरदार वारा, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सावध राहण्याची सूचनाही जारी करण्यात आली आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

मुंबई वेधशाळेने राज्यातील विविध भागात पावसाचा इशारा दिला होता. वेधशाळेने 17 जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ , वर्धा, नागपूर, भंडारा , गोंदिया, चंद्रपूर , गडचिरोली भागात पावसाची शक्यता वर्तवली होती. या भागात वेधशाळेने यलो अलर्ट दिला.

मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात

वेधशाळेच्या अंदाजानंतर मुंबई, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे.अनेक शेतकऱ्यांची पावसाअभावी भाताची पुनर्लागवड करण्याची कामे खोळंबली होती. पावसाने विश्रांती घेतल्याने काही ठिकाणी पुनर्लागवड करण्यात आलेला भात करपून जाण्यासही सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.

तळकोकणात मुसळधार पावसाची हजेरी

तत्पूर्वी, तळकोकणातही सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडीत शिरशिंगे गावातील धोंडवाडीतील तेरेखोल नदीला पूर आल्याची माहिती हाती आली आहे. या पुरामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे.कोकणातील काही शहरी भागात सखल पाणी साचल्याचंही दिसून आलं. एकंदरीतच दडून बसलेल्या मान्सूनने चांगलंच महाराष्ट्रात चांगलंच कमबॅक केल्याचं पाहायला मिळत आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असतानाही मराठवाड्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळं भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असून, चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे…

महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

संवेदनशील महाराष्ट्र जेव्हा एकत्र येतो, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होतं. एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी अवघ्या ४ दिवसांत तब्बल १० कोटी रुपये गोळा करून महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा माणुसकीचं एक अनोखं…

Leave a Reply

You Missed

पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

“सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

“सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल