‘माझ्या परवानगीशिवाय कोणतंही औषध देऊ नका’; वांगचुक यांच्या पत्नीचा रुग्णालयाला थेट इशारा

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी दखल घेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. 20 दिवसांच्या उपोषणानंतर कोर्ट आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपोषणस्थळी असलेल्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोनम वांगचूक यांच्यानंतर आता अभिजीत दीपके यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.

गितांजली वांगचूक यांचा आक्रमक पवित्रा

तर रुग्णालयात दाखल केलेल्या सोनम वांगचूक यांच्या पत्नी गितांजली यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. “माझ्या संमतीशिवाय कोणतंही औषध देऊ नका” असं म्हणत रुग्णालयाला अल्टिमेटम दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे अंग्मो यांनी ट्वीट देखील केलं आहे.

परवानगीशिवाय सोनम यांना कोणतेही औषध देऊ नये

गीतांजली वांगचूक यांनी म्हटलं की, ‘माझी, कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय सोनम यांना कोणतेही औषध तोंडावाटे आणि शिरेवाटे देऊ नये’. सध्या त्या स्वत: सफदरजंग रुग्णालयात उपस्थित आहेत. त्या वांगचूक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.तसेच मिळालेल्या माहितीनुसार,सोनम वांगचूक यांची उपोषणाच्या 21 व्या दिवशी तब्येत बिघडली, असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना शनिवारी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, डॉक्टरांचा सल्ला आणि दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

वांगचुक २८ जूनपासून उपोषणाला बसले आहेत

नीट (NEET) परीक्षेतील गैरप्रकार आणि त्यामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वांगचुक २८ जूनपासून उपोषणाला बसले होते.

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे वांगचुक अशक्त

दरम्यान दिल्लीचे डेप्युटी कमिशनर सचिन शर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असल्याचं सांगितलं.तसेच रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ उपोषण आणि शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे वांगचुक अशक्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा

वांगचूक यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करताच आक्रमक पवित्रा घेत कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शनिवारी आमरण उपोषणाची घोषणा केली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की,’मी आजपासून आमरण उपोषण सुरू करत आहे’.तसेच सोनम वांगचूक यांच्या मेडिकल टीमने त्यांच्या तब्येतीविषयी महत्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, वांगचूक यांची तब्येत आता स्थिर आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत. त्यांचा रक्तदाब आणि साखर कमी झाली आहे. त्यांचा ईसीजी रिपोर्ट देखील नॉर्मल आहे.

मात्र आताची परिस्थिती पाहता दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावरील उपोषण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

मुंबई पश्चिम उपनगरात वर्सोवा व मढ यादरम्यान सुमारे दोन हजार ३९५ कोटी रुपयांच्या केबल-स्टेड उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मढ बेट आणि वर्सोवा यांना जोडणाऱ्या मालाड खाडीवरील प्रस्तावित…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक