रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

रायगड जिल्ह्यातील माणगाव-रोहा परिसरात साकारत असलेल्या ‘बल्क ड्रग पार्क’ प्रकल्पावरून सध्या वाद समोर येत असल्याचं दिसत आहे. या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. एवढंच नाही तर जमीन संपादन, पर्यावरण, पुनर्वसन आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर आंदोलकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बल्क ड्रग पार्क म्हणजे काय?

बल्क ड्रग पार्क हा केंद्र व राज्य शासनाचा एक महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्प आहे.यामध्ये औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालतयार केला जातो.या प्रकल्पाबद्दल शासनाचा दावा आहे या प्रकल्पामुळे हजारो कोटींची गुंतवणूक होऊ शकते, स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि परिसराचा औद्योगिक विकास होईल.

प्रकल्पाला विरोध का आणि हा वाद नक्की का निर्माण झाला आहे?

प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली असली, तरी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला ठाम विरोध होत आहे. त्यांच्या विरोधाचं मुख्य कारण म्हणजे पर्यावरणाची हानी व आरोग्याचा धोका.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार केमिकल आणि औषध निर्मिती प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन स्थानिक जलस्रोत, जमीन आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती ग्रामस्थांना आहे.

जमीन संपादनाचा प्रश्न

जमीन संपादनाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुपीक शेतजमिनी, फळबागा आणि राहती घरे प्रकल्पामुळे बाधित होण्याची शक्यता असल्यानं स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

पुनर्वसन आणि रोजगाराची अनिश्‍चितता

प्रकल्पासाठी जमिनी घेतल्यानंतर योग्य पुनर्वसन आणि स्थानिकांना थेट रोजगारात प्राधान्य मिळेल का, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टता होत नाहीये त्यामुळे स्थानिकांचे पुनर्वसन आणि रोजगार मिळेल का या शाश्वती नाही. त्यामुळे आता याबाबत स्थानिकांनी लेखी हमीची मागणी केली आहे. केवळ तोंडी आश्वासनांवर विश्वास न ठेवता, स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण, आरोग्य सुरक्षा आणि रोजगाराबाबत शासनाने लेखी करार व पारदर्शकता ठेवावी, ही आंदोलकांची मुख्य अट आहे.

प्रकल्पाचे काम सुरू असताना स्थानिक ग्रामस्थांनी काम रोखण्याचा आणि तीव्र निदर्शने करण्याचा प्रयत्न केला.

या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत कोलाड पोलीस ठाण्यात काही प्रमुख आंदोलक आणि स्थानिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.गुन्हे दाखल झाल्यामुळे या सामाजिक आंदोलनाला आता कायदेशीर व राजकीय वळण मिळाले आहे. ज्यामुळे स्थानिकांमध्ये आणखी असंतोष निर्माण झाला आहे.

संजय मानाजी कदम यांचा शेतकऱ्यांना भक्कम पाठिंबा 

रायगड लोकसभा संपर्क प्रमुख (उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) संजय मानाजी कदम यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या वादात संजय मानाजी कदम यांनी स्थानिकांची बाजू उचलून धरली आहे. संजय मानाजी कदम यांनी प्रशासनाला थेट इशारा देत स्थानिकांच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली आहे.

संजय मानाजी कदम म्हणाले की, “जर या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान होत असेल, तर या बल्क ड्रग पार्कला आमचा ठाम विरोध राहील. आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्थानिक नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही आणि सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.”

संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता

त्यामुळे आता एकीकडे राज्य शासन औद्योगिक विकासाचा आणि रोजगाराचा हवाला देत काम पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे ‘आरोग्य आणि जमिनीचे संरक्षण’ या मुद्द्यांवर स्थानिक शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीयेत. पोलिसांतील गुन्हे आणि राजकीय पक्षांची एंट्री यामुळे येत्या दिवसांत हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार यावर कोही तोडगा काढणार का हे पाहणंही महत्त्वाचे आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

    हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार व्यक्तिमत्त्व, अभिनयातील नटसम्राट नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत.वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं.पुण्याच्या जवळ असलेल्या डोणजे गावातील त्यांच्या ‘नानाची वाडी’ या…

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (कार्डियक अरेस्ट) निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अंतिम…

    Leave a Reply

    You Missed

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम

    पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम

    अभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ

    अभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ

    माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप

    माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप

    मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”

    मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण