
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय समोर आला आहे. ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली, तर आता तरुणींची संधी हुकणार नाही. आरोग्य तपासणीनंतर अशा तरुणींना पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ दिली जाणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली आहे.
मासिक पाळीदरम्यान शरीरात बदल होतात आणि अशा वेळी मुलींनी काळजी घ्यावी लागते
महिनोन्महिने मैदानावर घाम गाळायचा, पण ऐन परीक्षेच्या दिवशी पोटात कळा, कंबरदुखी, थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर येण्यासारखा त्रास झाल्यास मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती अनेक मुलींना असते. १०० मीटर आणि ८०० मीटर धावणे, गोळाफेक किंवा लांब उडीसारख्या चाचण्यांमध्ये वेदना आणि अशक्तपणामुळे धावण्याचा वेग आणि कामगिरीवर मोठा परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीदरम्यान शरीरात बदल होतात आणि अशा वेळी मुलींनी काळजी घ्यावी लागते, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अपूर्वा देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.
ऐन परीक्षेच्या दिवशी हा त्रास झाला तर कामगिरीवर त्याचा परिणाम होऊ शकतो
मासिक पाळीच्या काळात काही तरुणींना तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत 100 मीटर आणि 800 मीटर धावणं, गोळाफेक किंवा लांब उडीसारख्या शारीरिक चाचण्या देताना अडचणी येऊ शकतात. प्रत्येक मुलीला होणारा त्रास वेगवेगळा असतो. पण ऐन परीक्षेच्या दिवशी हा त्रास झाला तर कामगिरीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीदरम्यान शरीरात बदल होतात. या काळात धावण्याच्या क्षमतेवर किती परिणाम होतो. अशा वेळी मुलींनी काळजी घ्यावी लागते, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अपूर्वा देशपांडे यांनी सांगितले. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन राज्य सरकारने मासिक पाळीच्या काळात शारीरिक चाचणी आल्यास मुलींना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये, अशी भावना
मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेमुळे पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये, अशी भावना व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयाचे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींनी स्वागत केले आहे.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली म्हणून आता तरुणींची संधी हुकणार नाही. अशा तरुणींना आरोग्य तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही घोषणा केली आहे.
सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय
सरकारच्या या निर्णयाचं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींनीही स्वागत केलं आहे. अनेक महिने तयारी करून शारीरिक चाचणीची वेळ येते. मात्र, मासिक पाळीमुळे वेदना आणि अशक्तपणाचा सामना करावा लागला तर अपेक्षित कामगिरी करणं कठीण होते. त्यामुळे केवळ मासिक पाळीमुळे एखाद्या मुलीची संधी हुकू नये, अशी भावना या तरुणींनी व्यक्त केली आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेमुळे पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये, यासाठी सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार, आरोग्य तपासणीचे निकष काय असणार आणि अधिकृत नियमावली कधी येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.








