सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी सुप्रिया सुळे;जंतरमंतर मैदानावर थेट हजेरी,केली महत्त्वाची घोषणा!

सध्या संपूर्ण देशभर चर्चेत असलेला विषय म्हणजे दिल्लीत जंतरमंतर मैदानात सुरु असलेलं सोनम वांगचुक यांचं उपोषण. सोनम यांनी NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारांमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देऊन संविधानाच्या सहाव्या अनुसूचीचा समावेश करणे अशा अनेक मुद्द्यांसाठी आंदोलन सुरु केलं आहे.

सुप्रिया सुळेंची वांगचुक यांच्या उपोषणस्थळी भेट

दरम्यान आज (17 जुलै 2026) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोनम यांच्या आंदोलनाला भेट दिली.उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे या जंतरमंतर मैदानावर गेल्या. होत्या. तिथे त्यांनी सोनम वांगचुक यांची विचारपूसही केली. यावेळी त्यांनी तरुणांना संबोधित देखील केलं.

आंदोलनाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडण्याचं आश्वासन

दरम्यान यावेळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा आपण हिवाळी अधिवेशनात मांडण्याचं तसेच हिवाळी अधिवेशनाआधी आणखी दोन ठिकाणी हा मुद्दा मांडण्याचं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. त्या म्हणाल्या की, “राज्यात आंदोलन चाललं असेल तर ती आमची नैतिक जबाबदारी आहे की, समाजात ज्या गोष्टी सुरु आहेत त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजेत. समाजातील पालकांमध्ये, तरुण पिढीत एक भावना आहे, इथे आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत, आमची नैतिक जबाबदारी असते की, समाजात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या संसदेत मांडल्याच पाहिजेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बैठकीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय मांडणार 

तसेच हिवाळी अधिवेशनाआधी दोन ठिकाणी हा विषय मांडणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. त्या म्हणाल्या की, “संसद सुरु होण्याआधी दोन ठिकाणी मी या विषयावर बोलणार आहे. एकतर रविवारी सकाळी सर्वपक्षीय बैठकीत बोलणार आहे. केंद्र सरकारने ही रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय, भारतात कमी झालेला पाऊस, त्याचबरोबर शिक्षणात झालेला सावळा गोंधळ, राम मंदिरचे जे व्हिडीओज येत आहेत, असे अनेक गंभीर विषय देशासमोर आहेत. सर्वपक्षीय बैठकीत हे सर्व विषय आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत बोलून मांडणार आहोत”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

“सोमवारी सकाळी 10 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मी इथल्या भावना आणि इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता याबाबत बोलणार आहे”,अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुप्रिया सुळेंप्रमाणेच या राजकीय मंडळींचीही सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी भेट

दरम्यान सुप्रिया सुळेंप्रमाणेच अनेक असे राजकीय मंडळी आहेत ज्यांनी सोनम वांगचुक यांचं उपोषणस्थळी भेट देत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्याशी संवाद साधला. यामध्ये

प्रकाश आंबेडकर: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन वांगचुक यांची भेट घेतली आणि भाजप सरकारला यावर तातडीने चर्चा करण्याचे आवाहन केले.

पवन खेरा: काँग्रेस नेते पवन खेरा यांनी दिल्लीत आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केलं.

अमित ठाकरे: मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी देखील दिल्ली गाठून सोनम वांगचुक यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

तसेच यांच्याशिवाय तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. एवढंच नाही तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून, उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांसारख्या प्रमुख मुख्यमंत्र्यांनी व विरोधी पक्षनेत्यांनी ऑनलाईन किंवा निवेदनाद्वारे वांगचुक यांच्या उपोषणाला व मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक