श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

श्रीवर्धन.
श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

प्रतिनिधी -संदेश घोलप,
नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत भव्य प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘नंदनवन’वर ऐतिहासिक सोहळा
दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांना मोठा हादरा; आगामी निवडणुकांपूर्वी नव्या शक्तिसंतुलनाची नांदी
​या घडीची सर्वात मोठी, खळबळजनक आणि अधिकृत बातमी थेट मुंबईतून समोर येत आहे! दक्षिण रायगडच्या राजकारणातील सर्वात मोठा राजकीय भूकंप अखेर आज प्रत्यक्षात येत आहे.
​गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुल चौगुले आज संध्याकाळी अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करत आहेत! उद्धव ठाकरे गटाला हा दक्षिण रायगडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे!

शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा महाड विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक राजकीय मोर्चेबांधणी पूर्ण झाली आहे.
​आज मंगळवार, दिनांक २३ जून रोजी संध्याकाळी, मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘नंदनवन’ बंगल्यावर हा हायव्होल्टेज सोहळा पार पडणार आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड. अतुल चौगुले आणि त्यांचे शेकडो कट्टर समर्थक आज अधिकृतपणे हाती धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
​या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रायगड लोकसभा संपर्क प्रमुख अनिल नवगणे आणि दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर यांच्यासह श्रीवर्धनमधील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.

ॲड. अतुल चौगुले हे केवळ श्रीवर्धन शहरापुरते मर्यादित नसून, संपूर्ण तालुक्यात व मतदार संघात एक सुशिक्षित आणि दांडगा जनसंपर्क असलेला चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांनी उद्धव ठाकरे गटातून थेट सत्ताधारी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे दक्षिण रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठी पडझड सहन करावी लागणार आहे. आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर या प्रवेशामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून, स्थानिक पातळीवर शिवसेनेचे पारडे कमालीचे जड झाले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबईत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच अमित शहा हे मुंबई विभागीय भाजप आणि प्रदेश भाजपच्या…

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाल्यापासून एफडीए विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळयुक्त पदार्थ असो, धान्य,दारू असो किंवा थेट हॉटेलचे परवाने रद्द करणं असो. तुकाराम…

    Leave a Reply

    You Missed

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी

    निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी