निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी

आजकाल सगळेचजण आपापल्या आयुष्यात इतके व्यस्त आहेत की एकमेकांशी बोलण्यासाठी, भेटण्यासाठीही वेळ नाही आहे. पण या व्यस्त आयुष्यात जर आपल्या मृत वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही वेळ न मिळणं यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय असू शकतं. होय, हे घडलं आहे हरियाणातील सोनीपत येथे. येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने समाजमन हेलावून टाकलं. यामुळे वृद्ध पालकांचे वाढते एकाकीपण आणि बदलते कौटुंबिक संबंध यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

निर्दयीपणाचा कळस

ज्या मुलींना लहानाचे मोठे केले, शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आणि त्यांच्या प्रत्येक स्वप्नासाठी आयुष्यभर मेहनत घेतली, त्याच मुलींना वडिलांच्या अखेरच्या क्षणी भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही. हरियाणातील सोनीपतच्या वेस्ट रामनगर परिसरातील एका वृद्धाश्रमात राहणारे 74 वर्षीय शिवचरण गुप्ता यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत. वृद्धाश्रम प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या सुमारे 20 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. याची माहिती वेळोवेळी त्यांच्या मुलींना देण्यात आली होती. मात्र, कोणतीही मुलगी त्यांना भेटण्यासाठी आली नाही.

वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

वृद्धापकाळात मुलींनीच आपल्या वडिलांना दूर लोटलं.वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आणि तिथंच मुलींची वाट बघत वडिलांनी प्राण सोडले. त्यांच्यावर अंत्यसंस्काराला येण्यासाठीही मुलींना वेळ नव्हता. वृद्धाश्रम संचालकांनी फोन केल्यावर त्यांना रुपये पाठवले आणि अंत्यसंस्कार उरकून घ्या असं सांगण्यात आलं. वडिलांच्या अस्थी नेण्यासाठीही मुली आल्या नाहीत. सोनीपतच्या शिवचरण गुप्ता यांच्यावर अंत्यसंस्कार आणि अस्थी विसर्जनाची जबाबदारी वृद्धाश्रमानेच पार पाडली.

मुलींना शेवटचं एकदा पाहण्याची तीव्र इच्छा होती

शिवचरण गुप्ता हे पूर्वी कपड्यांचे व्यापारी होते. पत्नीसोबत ते वृद्धाश्रमात राहायला आले होते. तेव्हा काही काळाने पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर ते एकटेच वृद्धाश्रमात राहत होते. आजारपणात असताना त्यांना आपल्या मुलींना शेवटचं एकदा पाहण्याची तीव्र इच्छा होती. मात्र ती इच्छा अपुरीच राहिली आणि मुलींची वाट पाहत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवचरण गुप्ता यांना मुलगा नव्हता. त्यांनी आपल्या तीनही मुलींचे प्रेमाने संगोपन केले. त्यांना चांगले शिक्षण दिले आणि स्वावलंबी बनवले. त्यापैकी दोन मुली शिक्षिका झाल्या. मात्र, वडिलांच्या निधनानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने संपर्क साधला असता, मुलींनी वेळेअभावी येणे शक्य नसल्याचे सांगितल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

व्हिडिओ कॉलवर पाहिला अंत्यसंस्कार

वृद्धाश्रम प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुलींनी स्वतः येण्याऐवजी अंत्यसंस्काराचा खर्च म्हणून ५१०० रुपये पाठवले आणि अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवण्याची विनंती केली.अंत्यसंस्काराची प्रक्रिया त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पाहिल्याचे सांगितले जात आहे.

कुटुंबातील कोणीही उपस्थित नसल्याने वृद्धाश्रमातील कर्मचारी आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत शिवचरण गुप्ता यांची अंत्ययात्रा काढली. सर्व धार्मिक विधी पार पाडत त्यांनी मुलाचे कर्तव्य निभावले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

अस्थीही नेण्यास मुलींचा नकार

अंत्यसंस्कारानंतरही मुलींनी वडिलांच्या अस्थी घेण्यासाठी येणार नसल्याचे सांगितलं. त्यांनी त्या अस्थी गंगेत विसर्जित करण्याची विनंती त्यांनी वृद्धाश्रम प्रशासनाला केल्याची माहिती समोर आली आहे. मुलांपेक्षा मुलींना आपल्या पालकांची काळजी असते, प्रेम असतं असं म्हणतात पण या प्रसंगानंतर खरंच आता मुली आणि मुले वेगळी आहे का? असा प्रश्न पडतो.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    दक्षिण दिल्लीतील सत्यनिकेतन भागात मुलांचे वसतिगृह असलेली ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर १०जण गंभीर जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अद्याप ३०…

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    शिक्षक दिनानिमित्त देशभरातली ८२ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवडण्यात आलं आलं होतं. त्यात महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू