कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून एका शाळेनं चक्क त्याला ५० रुपयांचा दंड आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरा रोड मधील अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळेतील एका विद्यार्थ्याने मेथीची भाजी आणली होती. शाळा व्यवस्थापनाने डब्यात मेथी आणण्याची परवानगी नसल्याचे सांगत शाळेच्या कँटीनमधील खाद्यपदार्थ आणून दिले व बदल्यात ५० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच विद्यार्थ्याच्या डब्यातील जेवणाबाबत आक्षेप घेतल्यानंतर त्याला कॅन्टीनमधून दुसरे खाद्यपदार्थ देण्यात आले.

विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणल्याने शाळेने विद्यार्थ्याला दंड

भाईंदरच्या इंद्रलोक भागातील तपोवन विद्यालयात हा प्रकार घडला.विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणल्याने शाळेने विद्यार्थ्याकडून ५० रुपये शुल्क घेतल्याची घटना समोर आली. याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेकडे खुलासा मागितला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता चालवत असलेल्या मीरा रोड येथील एका शाळेने पर्युषण पर्व काळात कांदा-लसूणसह बटाटे असे पदार्थ आणू नये, असे परिपत्रक या शाळेने काढले होते. त्यानंतर आता भाईंदरच्या या शाळेतील हा प्रकार समोर आला आहे.

कांदा, लसूण, बटाटे नंतर आता मेथी आणण्यास मनाई

कांदा, लसूण, बटाटे यानंतर आता शाळेने विद्यार्थ्यांना डब्यात चक्क हिरवी मेथी आणण्यास मनाई केली आहे. या प्रकारावरून आता संताप व्यक्त केला जात आहे. तर या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यावर शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काही समाजांमध्ये मेथी वर्ज्य असल्याने हा आदेश देण्यात आल्याचे समजते.

विद्यार्थ्याला शाळेतून जेवण दिले

‘डब्यात हिरवी मेथी आणण्यास परवानगी नसून, विद्यार्थ्याला शाळेतून जेवण देण्यात आले आहे,’ असा शेरा वर्गशिक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या दैनंदिनीत देण्यात आला. तसेच त्याला ५० रुपये दंड आकारण्यात आला. या संदर्भात संबंधित शाळेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शाळेला कारणे दाखवा नोटीस 

या तक्रारीनंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने भाईंदरमधील ‘तपोवन विद्यालय’ या शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या शाळेतील बहुतांश विद्यार्थी जैन समाजातील असल्याचे समजते. आहाराबाबत निर्बंध घालणे हे ‘शिक्षण हक्क कायद्या’चे उल्लंघन असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मनसेचा आक्रमक पवित्रा

तक्रार दाखल करणारे मनसेचे पदाधिकारी रॉबर्ट डिसूझा यांच्या म्हणण्यानुसार, तपोवन विद्यालयातील बहुतांश विद्यार्थी जैन समाजातील आहेत आणि प्रवेशाच्या वेळी पालकांना डब्यात मांसाहारी पदार्थ व कंदमुळे न देण्यास सांगितले जाते.याआधीही शहरातील एका शाळेने कांदा, लसूण डब्यात आणण्यास मनाई केल्याप्रकरणी मनसेने महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून संबंधित शाळेला पालिकेने नोटीस बजावत, खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतरही बंदी घालण्याचे प्रकार थांबले नसल्याचे चित्र असून आता मेथीही खाण्यास वर्ज्य करण्यास सांगण्यात आल्याने पालकांनी नाराजी नोंदवली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील एका पोलीस अधिकाऱ्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ५७ वर्षे पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे असं त्यांचं नाव असून ड्युटीवर असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं अन्…

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात एक विशेष मोहीम आयोजित करण्यात येत आहे. आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि सह…

    Leave a Reply

    You Missed

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल