ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

ऊस दरवाढीसाठी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी पुणे- बंगळुरू महामार्गावरील वाहतूक रोखली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाक्याजवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ऊसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महामार्ग रोको आंदोलन सुरू केले आहे. आज ५ नोव्हेंबर २०२६ रोजी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.तरीही आंदोलन सुरुच आहे.

रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प 

या आंदोलनामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी तसेच महामार्ग पोलिसांनी प्रवाशांना वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

ऊसाला ४५०० रुपयांची पहिली उचल मिळावी या प्रमुख मागिणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असली तरी या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या आंदोलनाचा फटका परिवहन विभाग आणि गोकुळच्या दूध विक्रीला बसला आहे.

एसटी महामंडळाचे ५ कोटींचे नुकसान

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाचा फटका आता एसटी महामंडळाच्या परिवहन विभागालाही बसलाय. ऐन दिवाळीच्या हंगामात कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या तब्बल १६६ एसटी फेऱ्या रद्द करण्याची वेळ परिवहन विभागावर आली आहे. यामुळे एसटी महामंडळाचं जवळपास ५ कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावी आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असतानाच फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऊस दर आंदोलनाचा परिणाम आता केवळ साखर कारखाने आणि वाहतुकीपुरता मर्यादित न राहता सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवरही झाला आहे.

गोकुळच्या दूध विक्रीला फटका

पुणे- बंगळुरू महामार्गावर सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाचा फटका आता गोकुळ दूध संघालाही बसू लागला आहे. मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या गोकुळच्या दूध विक्रीवर तब्बल ५० टक्के परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने गोकुळचे अनेक दूध टँकर रस्त्यातच अडकून पडले आहेत. हे टँकर वाहतूक कोंडीतून बाहेर काढून मार्गस्थ करावेत, अशी मागणी गोकुळ प्रशासनाने पोलिस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, अद्यापही टँकरची वाहतूक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील दूध विक्रीवर थेट परिणाम झाला आहे. आंदोलन असंच सुरू राहिल्यास मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये होणारा दूध पुरवठाही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस दर आंदोलनाचा परिणाम आता दूध वितरण व्यवस्थेवरही जाणवू लागला.

  • Related Posts

    शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना नुकतंच पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती समोर आली होती. शरद पवार यांना बुधवारी (4 नोव्हेबर) सकाळी पुण्याच्या रुबी हॉल…

    रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

    रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. व्यवसायासाठी तब्बल लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वारंवार…

    Leave a Reply

    You Missed

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

    शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

    शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

    रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

    रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

    डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण याचा भारताला काय फायदा होणार?

    डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का;  पण याचा भारताला काय फायदा होणार?

    सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

    सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

    संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

    संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

    सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

    सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

    पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

    पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

    दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा दणका! टीव्ही, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागली

    दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा दणका! टीव्ही, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागली