रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. व्यवसायासाठी तब्बल लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वारंवार पैशांची मागणी करूनही पैसे परत न देता उलटी धमकी दिल्याने अखेर सावर्डे पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय आहे हे प्रकरण?

रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही २४ लाखांची कथित आर्थिक फसवणूक घडली आहे. तक्रारदार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४ पासून व्यवसायामध्ये मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जानेवारी २०२६ पासून मार्च २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत बँक खात्यांद्वारे आणि RTGS द्वारे तब्बल २४ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.

पोलिसांनी चौघांना घेतलं ताब्यात

जेव्हा तक्रारदाराने आपले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि तक्रारदाराला धमकावले. या व्यवहारापोटी देण्यात आलेला २४ लाखांचा चेक देखील बँकेत वटला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सावर्डे पोलीस ठाण्यात धाव घेतली. १० ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांनी एफआयआर क्रमांक ००९० नोंदवला आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरु

भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३५१(२), ३५२ आणि ६१ अंतर्गत खालील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन सुभाष पिपळकर,चंद्रशेखर सुरेश पवार,संतोष केशव शिर्के,योगेश बामगुडे पाटील,या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावर्डे पोलीस सध्या या सर्व आर्थिक व्यवहारांची, बँक खात्यांची सखोल चौकशी करत असून हे पैसे नेमके कुठे हस्तांतरित झाले, याचा शोध घेत आहेत.

नागरिकांनी अत्यंत सावध राहणं गरजेचं

दरम्यान व्यवसायाच्या नावाखाली किंवा मोठा निधी मिळवून देण्याच्या बहाण्याने होणाऱ्या अशा फसवणुकीपासून नागरिकांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना कायदेशीर कायदपत्रे आणि बँक नोंदी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. आता या प्रकरणात सावर्डे पोलीस आरोपींवर नेमकी काय कडक कारवाई करतात आणि तक्रारदाराचे पैसे परत मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली असतानाही सर्रासपणे फोडले जात आहे. ८ नोव्हेंबरपासून मुंबईत तर आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.राज्यासह मुंबई आगीच्या दुर्घटना…

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकुळच्या निकालानंतर कोरम पूर्ण होत नसल्याने चार शासन नियुक्त संचालकाच्या निर्णयावरून वातावरण तापलं आहे. या निर्णयाविरोधात पुकारलेल्या आंदोलनात आंदोलक…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी