पवार कुटुंबातून सध्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुबी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. सुञांवी दिलेल्या माहितीनुसार पवारांना कफ आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू
खासदार सुप्रिया सुळे यांनीही तातडीने प्रतिक्रिया देत काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असे सांगितले. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत खुद्द डॉक्टरांनी समोर येत माहिती दिली आहे. शरद पवार यांना नेमकं काय झालंय? त्यांना किती दिवस रुग्णालयात राहावे लागणार, याची सविस्तर माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना ऍडमिट केल्याची माहिती
रुबी रुग्णालयातील डॉक्टर परवेझ ग्रँट यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांना काय त्रास आहे, याची माहिती दिली. शरद पवारांना आज (2 नोव्हेंबर) दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना ऍडमिट करण्यात आले आहे. काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. सध्या शरद पवार यांची तब्येत उत्तम आहे, असे डॉक्टर परवेझ यांनी सांगितलं आहे.
शरद पवार यांचे सीटीस्कॅन करण्यात आलं आहे
तसेच शरद पवार आज दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना छातीत थोडेफार दुखत असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यांच्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. ते ठिक आहेत. दोन दिवस आराम केल्यानंतर त्यांना घरी सोडलं जाणार आहे. शरद पवार यांचे सीटीस्कॅन करण्यात आले आहे. त्यांच्या फुफ्फुसांत थोडसं फ्ल्यूअड आहे. गोळ्या, औषधांनी ते बरे होतील, अशी अतिरिक्त माहिती डॉक्टर परवेझ ग्रँट यांनीद दिली. तसेच शरद पवार यांची प्रकृती खूप चांगली आहे, काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.
Baba has been admitted to Ruby Hall Clinic, Pune, following a bout of cough. He is undergoing medical tests, and all his health parameters are stable.
Thank you all for your concern and good wishes.
— Supriya Sule (@supriya_sule) November 2, 2026
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती
दरम्यान शरद पवार यांनी शनिवार 31 ऑक्टोबर आणि रविवार 1 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती. यावेळी तुळशी गावात त्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला होता. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या होत्या. या समस्या सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.
दरम्यान, शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा सुरू केला होता. शेतकऱ्यांना भेटून ते त्यांच्या व्यथा जाणून घेत होते. असे असताना त्यांची तब्येत बिघडली आहे. तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काहीही काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता
दरम्यान आज होणारा शरद पवार यांचा दुष्काळी दौराही रद्द करण्यात आला. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीचं कारण देऊन हा दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र, पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळेच हा दौरा रद्द करण्यात आल्याचं कारण समोर आलं आहे. त्यानंतर पवार हे सोलापूरहून पुण्याला आले होते. पण त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुबी रुग्णालयात त्यांच्या विविध चाचण्या केल्या जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पवारांना कफ झाला होता. तसेच अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
दिवाळीनंतर शरद पवार हे करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार
दिवाळीनंतर शरद पवार हे करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहे. काल रात्री बारामती, भिगवण परिसरात मोठा पाऊस झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी दिली. माञ सध्या शरद पवारांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. खासदार शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना अचानक रुग्णालयात का न्यावे लागले, असे विचारले जात होते.









