‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

मिरा-भाईंदर महापालिकेत सध्या विकासकामांपेक्षा जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलंय. गेली २५ वर्षे सुरू असलेला नॉनव्हेज मेन्यू महासभेतून अचानक गायब झाल्याने ‘व्हेज’ जेवणावरून राजकारणाला चांगलाच ‘नॉनव्हेज’ तडका बसलाय. विरोधकांसोबतच आता सत्ताधारी नगरसेवकही या निर्णयाविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मांसाहारी पदार्थ पूर्णपणे हद्दपार झाल्याने वाद पेटला

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत सध्या जेवणाचा मेन्यू वाद चांगलाच चर्चेत आला आहे. महासभेतीली जेवणातून गेल्या सहा महिन्यांपासून मांसाहारी पदार्थ पूर्णपणे हद्दपार झाल्याने वाद पेटला आहे. महापालिकेत केवळ शाकाहारी जेवणाचीच व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनीच नाही तर शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मागील २५ वर्षांपासून मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत होती. महासभेचे कामकाज अनेकदा दुपारपर्यंत चालते. त्यामुळे नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जेवण्याची व्यवस्था करण्यात येते. अगोदर शाकाहारी आणि मांसाहारी असे जेवण देण्यात येत होते. पण गेल्या सहा महिन्यांपासून ही व्यवस्था बदलली आहे. त्यावरून नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.

नगरसेवकांमध्ये निर्णयाने नाराजी

मिरा-भाईंदर हे मूळ आगरी आणि कोळी समाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील बहुतांश स्थानिकांचा आहार मांसाहार आहे. मासे, मटण, चिकन हे येथील लोकांच्या दैनंदिन जेवणाचा भाग आहे. पण २५ वर्षांची परंपरा मोडीत काढत शाकाहारी जेवण दिल्या जात असल्याने नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. मांसाहारावर बंदी का घालण्यात आली, असा सवाल शिवसेनेसह काँग्रेस आमदारांनी केली आहे. तर काही भाजप आमदारही या निर्णयामुळे नाराज असल्याचे सांगितले जाते. हा निर्णय आगरी-कोळी समाजाच्या खाद्यसंस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

मांसाहाराच्या जेवणाचा मेन्यू का बंद करण्यात आला?

राजकीय लाभासाठी हा निर्णय घेतल्याचाही आरोप होत आहे. मिरा-भाईंदरमध्ये जैन समाजाचे एकगठ्ठा मत आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जैन समाजाला खूष करण्यासाठी सत्ताधारी भाजपने हा निर्णय घेतला का, असा सवाल विचारल्या जात आहे. तर सत्ताधारी भाजपमध्ये सुद्धा या निर्णयावरून नाराजी असल्याचे सांगितले जाते. महापालिका प्रशासनाने याविषयी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

खर्चात बचत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तर काहींनी यामागे राजकीय गणित असल्याचा आरोप केला आहे. महासभेच्या ताटातून मांसाहार हद्दपार झाल्याने हा वाद आता फक्त जेवणापूरता राहिलेला नाही, तर तो खाद्यसंस्कृती आणि मतांच्या राजकारणापर्यंत पोहोचला आहे. आगामी महापालिकेच्या सभेत त्यावरून गदारोळाची शक्यता आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    ठाणे जिल्ह्यातील लाखो मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR मोहिमेत तब्बल २८ लाख ६० हजार २६६ मतदारांचे गणना…

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    वय केवळ संख्या असते जर मनात आत्मविश्वास आणि नेमका अंदाज असेल, तर कोणतेही लक्ष्य गाठणे अशक्य नाही. याचा प्रत्यय कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या संचालिका आणि रायगड जिल्ह्यातील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या…

    Leave a Reply

    You Missed

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    दाऊदच्या वडिलोपार्जित घरावरील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाचा ब्रेक! हायकोर्टाच्या निर्णयामुळे बीएमसीला धक्का, २५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई थांबवली

    दाऊदच्या वडिलोपार्जित घरावरील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाचा ब्रेक! हायकोर्टाच्या निर्णयामुळे बीएमसीला धक्का, २५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई थांबवली

    कांदिवलीत प्रशासनाचा मोठा दणका! हायकोर्टाच्या आदेशानंतर ३५ कोटींची शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; ३९ अनधिकृत झोपड्यांवर चालला बुलडोझर

    कांदिवलीत प्रशासनाचा मोठा दणका! हायकोर्टाच्या आदेशानंतर ३५ कोटींची शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; ३९ अनधिकृत झोपड्यांवर चालला बुलडोझर

    वादळानं दिशा बदलली! भारतावर ‘अकवान’चे मोठे संकट; १४ राज्यांना पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

    वादळानं दिशा बदलली! भारतावर ‘अकवान’चे मोठे संकट; १४ राज्यांना पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर