वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

वय केवळ संख्या असते जर मनात आत्मविश्वास आणि नेमका अंदाज असेल, तर कोणतेही लक्ष्य गाठणे अशक्य नाही. याचा प्रत्यय कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या संचालिका आणि रायगड जिल्ह्यातील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ. कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. नाशिक येथे २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या ‘महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम २०२६’ स्पर्धेत त्यांनी रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावून रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या यशामुळे शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रांतून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कुमुदिनी डुंबरे-चव्हाण यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण 

कुमुदिनी डुंबरे-चव्हाण यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केले.  महाविद्यालयीन काळातच त्यांनी क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. १९९४-९५ मध्ये त्यांनी ॲथलेटिक चॅम्पियन म्हणून मोठे नाव कमावले होते.   महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी आपला प्रवास शिक्षण क्षेत्राकडे वळवला. ‘कोकण विकास प्रबोधिनी’ या संस्थेची स्थापना करत त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले. रायगड जिल्ह्यात नावारूपाला आलेली ‘मॉडर्न इंग्लिश स्कूल’ म्हणजे त्यांनी लावलेले एक छोटेसे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.

२०२४ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आपल्या लढाऊ  बाण्याची चुणूक दाखवली होती

कुमुदिनी चव्हाण यांचा प्रवास केवळ शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. २०२४ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आपल्या लढाऊ  बाण्याची चुणूक दाखवली होती. खासदार सुनील तटकरे आणि माजी खासदार अनंत गीते यांच्यासारख्या दिग्गजांविरोधात लढणारी रायगडची ही कन्या आता वयाच्या पन्नाशीकडे झेपावत असताना पुन्हा एकदा क्रीडांगणावर चमकली आहे.

२०२४ मध्ये रायगड लोकसभा लढवून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता

शिक्षण, सामाजिक कार्य आणि राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या रायगडच्या कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांनी आता क्रीडा क्षेत्रातही सुवर्णवेध घेतला आहे. नाशिकमध्ये झालेल्या ‘महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम २०२६’ स्पर्धेत त्यांनी रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल पटकावले आहे. पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या कुमुदिनी डुंबरे-चव्हाण यांनी १९९४-९५ मध्ये ॲथलेटिक चॅम्पियन म्हणून नावलौकिक मिळवला होता. पुढे त्यांनी कोकण विकास प्रबोधिनीची स्थापना केली आणि मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून रायगडात शिक्षणाचे रोपटे लावले. २०२४ मध्ये रायगड लोकसभा लढवून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.

यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे

वयाच्या पन्नाशीकडे झेपावत असताना २१ व २२ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले. ‘वय महत्त्वाचे नसते. अंदाज आणि आत्मविश्वास सोबत असेल तर निशाणा चूकत नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    मुंबईच्या वातावरणात गारठा वाढण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी मुंबईत शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. पण आता जर शेकोटी पेटली तर माञ थेट दंड भरावा लागणार आहे. शेकोटी पेटवाल तर…

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    बिस्लेरी म्हटलंकी देशातील सर्वांचाच विश्वासातल्या ब्रँडपैकी एक. पण आता त्याबाबतच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या बिस्लेरीच्या पाण्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात, त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.…

    Leave a Reply

    You Missed

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    दाऊदच्या वडिलोपार्जित घरावरील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाचा ब्रेक! हायकोर्टाच्या निर्णयामुळे बीएमसीला धक्का, २५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई थांबवली

    दाऊदच्या वडिलोपार्जित घरावरील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाचा ब्रेक! हायकोर्टाच्या निर्णयामुळे बीएमसीला धक्का, २५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई थांबवली

    कांदिवलीत प्रशासनाचा मोठा दणका! हायकोर्टाच्या आदेशानंतर ३५ कोटींची शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; ३९ अनधिकृत झोपड्यांवर चालला बुलडोझर

    कांदिवलीत प्रशासनाचा मोठा दणका! हायकोर्टाच्या आदेशानंतर ३५ कोटींची शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; ३९ अनधिकृत झोपड्यांवर चालला बुलडोझर

    वादळानं दिशा बदलली! भारतावर ‘अकवान’चे मोठे संकट; १४ राज्यांना पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

    वादळानं दिशा बदलली! भारतावर ‘अकवान’चे मोठे संकट; १४ राज्यांना पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

    दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; आगामी अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करणार

    दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; आगामी अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करणार

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद! ‘त्या’ एका कायदेशीर मुद्द्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा मोठा युक्तिवाद

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद! ‘त्या’ एका कायदेशीर मुद्द्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा मोठा युक्तिवाद