मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

मुंबईच्या वातावरणात गारठा वाढण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी मुंबईत शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. पण आता जर शेकोटी पेटली तर माञ थेट दंड भरावा लागणार आहे.

शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड!

होय, मुंबईत उघड्यावर शेकोटी पेटवणे किंवा कचरा जाळणे आता महागात पडणार आहे. मुंबईत प्रदूषणही वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 इतका म्हणजे ‘आरोग्यास हानिकारक’ पातळीवर पोहोचला. ‘एक्यूआय’ मध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने पालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

गारठा त्याचबरोबर हवेतील प्रदूषणाची पातळीही वाढण्याची शक्यता

मुंबईत उघड्यावर शेकोटी पेटवणे किंवा कचरा जाळणे आता महागात पडणार आहे. प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने दंड ५०० रुपयांवरून २ हजार रुपयांपर्यंत वाढवला असून ७४ विशेष पथके तैनात केली आहेत. मुंबईत हळूहळू गारठा त्याचबरोबर हवेतील प्रदूषणाची पातळीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी आतापासूनच कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

पालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला

हिवाळ्यात अनेक ठिकाणी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोटी पेटवली जाते. तसेच काही ठिकाणी कचरा जाळला जातो. यामुळे हवेत धूर पसरून प्रदूषण वाढते. हे रोखण्यासाठी पालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना किंवा शेकोटी पेटवून प्रदूषण करणाऱ्यांना २ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. यापूर्वी हा दंड ५०० रुपये होता.

प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने बांधकाम व्यावसायिक, कंपन्या, दुकाने आणि नागरिकांसाठी २८ नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी मुंबईत एकूण ७४ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

ही पथके मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये लक्ष ठेवणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस देणे, काम थांबवणे आणि दंड आकारणे अशी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच बांधकाम व्यावसायिकांनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    बिस्लेरी म्हटलंकी देशातील सर्वांचाच विश्वासातल्या ब्रँडपैकी एक. पण आता त्याबाबतच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या बिस्लेरीच्या पाण्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात, त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.…

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय समोर आला आहे. ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली, तर आता तरुणींची संधी हुकणार नाही. आरोग्य तपासणीनंतर अशा…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    दाऊदच्या वडिलोपार्जित घरावरील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाचा ब्रेक! हायकोर्टाच्या निर्णयामुळे बीएमसीला धक्का, २५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई थांबवली

    दाऊदच्या वडिलोपार्जित घरावरील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाचा ब्रेक! हायकोर्टाच्या निर्णयामुळे बीएमसीला धक्का, २५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई थांबवली

    कांदिवलीत प्रशासनाचा मोठा दणका! हायकोर्टाच्या आदेशानंतर ३५ कोटींची शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; ३९ अनधिकृत झोपड्यांवर चालला बुलडोझर

    कांदिवलीत प्रशासनाचा मोठा दणका! हायकोर्टाच्या आदेशानंतर ३५ कोटींची शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; ३९ अनधिकृत झोपड्यांवर चालला बुलडोझर

    वादळानं दिशा बदलली! भारतावर ‘अकवान’चे मोठे संकट; १४ राज्यांना पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

    वादळानं दिशा बदलली! भारतावर ‘अकवान’चे मोठे संकट; १४ राज्यांना पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

    दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; आगामी अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करणार

    दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; आगामी अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करणार

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद! ‘त्या’ एका कायदेशीर मुद्द्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा मोठा युक्तिवाद

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद! ‘त्या’ एका कायदेशीर मुद्द्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा मोठा युक्तिवाद

    मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे वडिलोपार्जित घर अन् संबंधित इमारतीवर BMC चा बुलडोझर; पण , इमारतीमधील मशिदीचा मुद्दा चर्चेत

    मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे वडिलोपार्जित घर अन् संबंधित इमारतीवर BMC चा बुलडोझर; पण , इमारतीमधील  मशिदीचा मुद्दा चर्चेत