दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा दणका! टीव्ही, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागली

दिवळीचा सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दिवाळीत सर्वजण नवीन कपड्यांपासून ते वस्तूंपासून खरेदी करत असतात. धनत्रयोदशी दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. पण यंदा टीव्ही, फ्रीज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत ३ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. कपडे, दिवे, पणत्या, तसेच मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी काही लोक सोने खरेदी करतात. सोबतच घरात वेगवेगळ्या वस्तूही आणल्या जातात.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल

याच काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होते. तेव्हा कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. दरम्यान, तुम्हीही या दिवाळीला टीव्ही, ग्रीझर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण या वस्तू आता महागल्या आहेत.

उपकरणांच्या किमतीत डिसेंबर महिन्यापर्यंत 5 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढ

इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उपकरणांच्या किमती वाढवलेल्या आहेत. दिवाळीच्या अगोदरच वेगवेगळ्या कंपन्यांनी हा निर्णय घेतलाय. आकड्यात सांगायचे झाल्यास इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत 3 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हायर, एलजी, ब्लू स्टार यासारख्या कंपन्यांच्या उपकरणांचा यात समावेश आहे. हॅवल्स कंपनीनेही आपल्या उपकरणांच्या किमतीत डिसेंबर महिन्यापर्यंत 5 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात आहे.

खिशाला झळ बसत आहे

विशेष म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणेच नव्हे तर मिठाईच्या किमतीतही यंदा वाढ करण्यात आलीय. काही ठिकाणी मिठाईची किंमत 15 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सध्या ड्राय फ्रुट्सची किंमत वाढलेली आहे. सोबतच साखर, दुधाचाही भाव वाढलेला आहे. त्यामुळे मिठाईची किंमतही वाढली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवालीत इलेक्ट्रॉनिक उपकरणाची खरेदी करायची असेल तर अगोदर उपकरणांचा वाढलेला भाव लक्षात घेऊनच त्याबाबत विचार करणे फायदेशीर ठरू शकते.

उपकरणांचे सुटे भाग, वाहतूक खर्च याचा खर्च वाढला

सध्या जागतिक पातळीवरील घडामोडी, युद्ध यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला. उपकरणांचे सुटे भाग, वाहतूक खर्च याचा खर्च वाढला. त्यामुळेच ही महागाई आल्याचे बोलले जात आहे.  त्यामुळे आता नवीन उपकरणे विकत घेण्यासाठी ग्राहकांना विचार करावा लागणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली असतानाही सर्रासपणे फोडले जात आहे. ८ नोव्हेंबरपासून मुंबईत तर आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.राज्यासह मुंबई आगीच्या दुर्घटना…

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकुळच्या निकालानंतर कोरम पूर्ण होत नसल्याने चार शासन नियुक्त संचालकाच्या निर्णयावरून वातावरण तापलं आहे. या निर्णयाविरोधात पुकारलेल्या आंदोलनात आंदोलक…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    मुंबईत अग्नीतांडव सुरुच! राञी मुंबईत ५ ठिकाणी आगीच्या घटना;मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी