महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा! प्रवासी गाढ झोपेत, रेल्वेवर दगडफेक अन् दरोडा घालत महिलांचे दागिने हिसकावले, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्यराञी एक धक्कादायक प्रसंगाला सामोर जावं लागलं आहे. मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर चक्क दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून रेल्वेगाडी थांबवली आणि दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील साताऱ्यात सालपे रेल्वे स्थानकाजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोड्याची घटना घडली आहे. सिग्नल यंञणेत बिघाड झाल्याने रेल्वे थांबली होती अशी माहिती आहे. पण दरोडा टाकण्यासाठीच चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या होत्या असही म्हटलं जात आहे.चोरट्यांनी वायर कापून महालक्ष्मी एक्स्प्रेस 15 मिनिटे रोखून धरली. रेल्वे थांबल्यानंतर चोरट्यांनी खिडकीतून हात घालून दोन महिला प्रवाशांचे 52 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले.

नेमकी घटना काय घडली?

मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आपल्या नियमित वेळेनुसार पुणे ते कोल्हापूर दरम्यान धावताना लोणंदनंतर सालपाकडे स्थानकादरम्यान धावताना सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड करून मध्यरात्री अडीचच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस सिग्नल अभावी थांबल्यानंतर हा प्रकार घडला. रेल्वे अचानक थांबल्याने कोणाला काहीच समजले नाही. अज्ञात चोरट्यांनी रेल्वे मार्गाच्या सिग्नलमध्ये बिघाड केल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस सालपा-स्थानकाच्या मागे थांबली यावेळी या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी एक्स्प्रेसच्या एस-2, एस-3 आणि एस-5 डब्यांमधून प्रवास करणाऱ्या मुंबईतील रहिवासी सुनिता गोरक्षनात तुपे आणि सहप्रवासी सुरेखा खाडे (खोपोली) हे कौटुंबिक कार्यक्रमांसाठी कोल्हापूरला निघाले होते. या दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने खिडकीचा आधार घेऊन हिसकावले.यावेळी महिलांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे पसार झाले.

चोरट्यांनी रेल्वेवरच दगडफेक केली

एवढंच नाही तर चोरी केल्यानंतर दरोडेखोरांनी पळ काढला. परंतु या चोरट्यांनी रेल्वेवरच दगडफेक केली. या दरोड्याच्या घटनेने प्रवाशांमध्ये मोठी दहशत पसरली. सिग्नल यंत्रणेत नेमका बिघाड कसा झाला, याचा प्रश्न प्रशासनाला पडला. तसेच हा दरोडा पूर्वनियोजित कट होता का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आता पोलिसांचं पथक हे पुढील कारवाईसाठी साताऱ्याला रवाना झाले आहेत. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी सुरु

दरम्यान एक्स्प्रेसवर दरोडा पडल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने पहाटे सव्वापाच वाजेपर्यंत दुरुस्ती करत सिग्नल यंत्रणा पूर्ववत केली. या सिग्नल तोडफोडीबाबत लोणंद आरपीएफमध्ये आणि दागिने चोरी प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरोड्यानंतर पोलिसांकडून श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने याचा सखोल तपास सुरू आहे.

 

  • Related Posts

    ‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा

    आज (१ नोव्हेंबर) राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला. अरबी मसुद्रात या चक्रीवादळादरम्यान चांगलाच खवळेल. मोठ्या लाटा उसळताना दिसतील असं सांगण्यात आलं आहे. 1 नोव्हेंबर रोजी ओडिसासह आंध्र प्रदेशमध्ये…

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    मालाड पूर्वेतील आप्पा पाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि सामाजिक कल्याणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘शिवस्वराज्य सेवक संघ’ आणि ‘सिद्धेश कदम फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,…

    Leave a Reply

    You Missed

    महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा! प्रवासी गाढ झोपेत, रेल्वेवर दगडफेक अन् दरोडा घालत महिलांचे दागिने हिसकावले, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा! प्रवासी गाढ झोपेत, रेल्वेवर दगडफेक अन् दरोडा घालत महिलांचे दागिने हिसकावले, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    ‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा

    ‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण