मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

मालाड पूर्वेतील आप्पा पाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि सामाजिक कल्याणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘शिवस्वराज्य सेवक संघ’ आणि ‘सिद्धेश कदम फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य ‘महाआरोग्य शिबिर आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड वितरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ८:०० ते दुपारी २:०० या वेळेत महारानी साईबाई विद्या मंदिर, आप्पा पाडा, मालाड (पूर्व), मुंबई येथे पार पडणार आहे.

विविध मोफत आरोग्य तपासण्या आणि वैद्यकीय मार्गदर्शन मिळणार

या शिबिरामार्फत विविध मोफत आरोग्य तपासण्या आणि वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बदलत्या जीवनशैलीत नागरिकांना एकाच छताखाली उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात, या उद्देशाने या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिबिरात काय काय लाभ नागरिकांना मिळणार आहेत ते पाहुयात.

मोफत वैद्यकीय तपासण्या : ईसीजी , मधुमेह , रक्तदाब , हृदयरोग तपासणी, डोळे तपासणी, फुफ्फुसांच्या विकारांची तपासणी तसेच पॅरेलिसिस संदर्भातील वैद्यकीय सेवा.

विशेष शस्त्रक्रिया मार्गदर्शन: हृदय शस्त्रक्रिया , किडनीस्टोन सर्जरी आणि एंजियोप्लास्टी यांसारख्या गंभीर आजारांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व वैद्यकीय मदत.

रक्तदान शिबिर : गरजू रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासू नये या सामाजिक भान जपत भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

आयुष्मान भारत कार्ड आणि NCMC कार्ड वितरण

या महाआरोग्य शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारा थेट सरकारी योजनांचा लाभ आहे. ज्यामध्ये,

NCMC कार्ड वाटप: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी आणि सुविधांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या National Common Mobility Card (NCMC) चे वाटप या प्रसंगी केले जाणार आहे.

आयुष्मान भारत कार्ड नोंदणी: पात्र नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचारांचे कवच देणाऱ्या आयुष्मान कार्डचे वाटप व नवीन कार्ड बनवून देण्याची सुविधा उपलब्ध असेल.

आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित

या सामाजिक उपक्रमासाठी सिद्धेशदादा कदम यांचे विशेष सहकार्य लाभले असून संदेश अ. कुडाळकर हे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. याशिवाय आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

आयोजकांचे नागरिकांना आवाहन

मालाड पूर्व व आप्पा पाडा परिसरातील सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा आणि NCMC कार्ड वाटप सोहळ्याचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन शिवस्वराज्य सेवक संघ आणि सिद्धेश कदम फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच या शिबिराबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्कही करू शकता,
संपर्क क्रमांक:
*9892843317,
*8689906086,
*9320434651,
*8928972600,

  • Related Posts

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे आजपासून सिंहस्थ महाकुंभ मेळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे. आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.…

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    सध्या ऑक्टोबर हीटमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना अचानक आलेल्या आजच्या पावसामुळे काहीसा का असेना पण दिलासा मिळाला आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली…

    Leave a Reply

    You Missed

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

    तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला

    तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला