तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला

महाराष्ट्र शासनाच्या नागरी हक्क संरक्षण विभागाने ‘तृतीयपंथी व्यक्ती अधिनियम २०१९’, ‘नियम २०२०’ आणि ‘महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी धोरण २०२४’ अंतर्गत पोलीस प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश देण्यात आले आहेत.

तृतीयपंथी व्यक्तींचे हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेबाबत राज्य शासनाचे ऐतिहासिक पाऊल 

महाराष्ट्रातील तृतीयपंथी व्यक्तींचे हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेबाबत राज्य शासनाने आणि नागरी हक्क संरक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. तृतीयपंथी व्यक्तींशी भेदभाव करणाऱ्यांवर आता थेट २ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार असून, पोलिसांनाही तक्रार प्राप्त झाल्यापासून अवघ्या २ दिवसांत तातडीने कारवाई करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.केंद्र सरकारच्या तृतीयपंथी व्यक्ती अधिनियम २०१९ च्या कलम १८ नुसार, तृतीयपंथी व्यक्तींच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षणासाठी सोनाली चौकेकर नेहमीच प्रयत्नशील

विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर हे सातत्याने तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलतच असतात. तृतीयपंथीय व्यक्तींना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि त्यांना सन्मानाने जगू देणे हा आहे. महाराष्ट्रात तृतीयपंथीयांच्या मूलभूत आणि कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे आणि त्यांना समाजात इतर नागरिकांप्रमाणेच सन्मानाने व सुरक्षित वातावरणात जगता यावं यासाठी सोनाली सदैव तत्पर असतात.

जीविताला हानी पोहोचवणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल 

दरम्यान तृतीयपंथी व्यक्तींना सक्तीच्या किंवा वेठबिगारीच्या कामात ढकलणे,सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास किंवा मार्गाचा वापर करण्यास अडथळा आणणे,त्यांना घर, गाव किंवा निवासस्थान सोडण्यास भाग पाडणे,तसेच त्यांचा शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक किंवा आर्थिक छळ करून जीविताला हानी पोहोचवणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल. असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी ६ महिने ते जास्तीत जास्त २ वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली जाईल. असंही सांगण्यात आलं आहे.

तृतीयपंथी (अधिकारांचे संरक्षण)नियम २०२० लागू झाले आहेत

ट्रान्समेन व ट्रान्सवुमेन यांची ओळख जन्मावेळी निशिचित झालेल्या लिंगापेक्षा वेगळी असते राष्टीय विधी सेवा प्राधिकरण विरुध्द युनियन ऑफ इंडिया २०१४ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयान दिलेल्या निकालानुसार तृतीयपंथी व्यक्ती यांना स्वातंज्य, समता, प्रतिष्ठा मिळण्याचा हक्क आहे. केंद्र शासनाचा तृतीयपंथी व्यक्ती (अधिकारांचे संरक्षण) अधिनियम २०१९ संपर्ण देशात लागू झाला आहे. सदर कायद्यामध्ये तृतीयपंथी व्यक्तींची ओळख, भेदभावास प्रतिबंध, ओळख प्रमाणपत्रासाठी अर्ज, ओळख प्रमाणपत्र प्रदान करणे, लिंग बदल, शासनाकडून कल्याणकारा उपाययांजना राबविणे, नोकरीत भेदभाव न करणे, आस्थापनांचे दायित्व, तक्रार निवारण यंत्रणा, शिक्षण, सामाजिक सरक्षा आणि आरोग्य, राष्ट्रीय परिषद, राष्ट्रीय परिषदेची कार्ये इत्यादी बाबतीत तरतुदी केल्या आहेत. केंद्र शासनाचे तृतीयपंथी (अधिकारांचे संरक्षण)नियम २०२० लागू झाले आहेत. त्यामध्ये सदर कायद्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सांगितली आहे.

तक्रार प्राप्त झाल्यापासून अवघ्या २ दिवसांच्या (४८ तासांच्या) आत संबंधित अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई सुरू करणे बंधनकारक

एवढंच नाही तर तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) नियम, २०२० (Transgender Persons Protection of Rights Rules, 2020) मधील नियम १३ हा तक्रार निवारण यंत्रणेशी (Grievance Redressal Mechanism) संबंधित आहे.म्हणजे नियम १३ अन्वये, प्रत्येक संस्थेने नियुक्त केलेला तक्रार अधिकारी तक्रार प्राप्त झाल्यापासून अवघ्या २ दिवसांच्या (४८ तासांच्या) आत संबंधित अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई सुरू करणे बंधनकारक आहे. किंवा तक्रार दाखल झाल्यापासून एकूण ३० दिवसांच्या आत संपूर्ण निवारण प्रक्रिया पूर्ण करण्याची कायदेशीर तरतूद आहे.या तरतुदीमुळे तक्रारी प्रलंबित राहणे किंवा त्याकडे दुर्लक्ष होणे यावर आळा बसतो, आणि प्रकरणाची वेळेवर नोंदणी व तपास निश्चित होतो.

एकंदरीतच तृतीयपंथी व्यक्तींना समाजातील इतर नागरिकांप्रमाणेच तातडीने न्याय आणि सुरक्षा मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याधीही दिवाळीपूर्वी 4 नोव्हेंबर रोजी दुष्काळ दौऱ्यावर निघाले असता, सोलापुरातूनच…

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या आवारात काल (२६ नोव्हेंबर २०२६ ) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडलेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या हल्ल्यात ३५ वर्षीय मंदार किवळेवर…

    Leave a Reply

    You Missed

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा