पुण्यात एस. एम. जोशी पुलावर पेपरफुटी आणि अनियमिततेविरोधात सलग १२ दिवस सुरू असलेले MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर राज्य सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर स्थगित करण्यात आले आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी पोहोचून MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी आमदार रोहित पवार यांना खांद्यावर घेत आंदोलनस्थळी मोठा जल्लोष केला.
आमदार रोहित पवार खांद्यावर घेत विद्यार्य़ांचा मोठा जल्लोष
पेपरफुटीविरोधात पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलनाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी सलग १२ दिवसांनंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे. याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या बहुतांश प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून, आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या निर्णयानंतर आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी आमदार रोहित पवार यांना खांद्यावर घेत मोठा जल्लोष केला. दरम्यान, सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘नैतिकतेला प्राधान्य देत रजेवर जातोय’ : विवेक भीमनवार यांचे ट्वीट
राज्य सरकारने पेपरफूटी प्रकरणात न्यायालयीन चौकशीची घोषणा केल्यानंतर विवेक भीमनवार यांनी स्वतः सक्तीच्या रजेवर जात असल्याचे स्पष्ट केले. आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत त्यांनी घोषणा केली, ते म्हणाले, “मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता, या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला माझे कायम प्राधान्य होते आणि यापुढेही असेल. जय हिंद… जय महाराष्ट्र!” याबद्दल एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.
एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏— Vivek Bhimanwar, IAS (@bhimanwar) October 11, 2026
दरम्यान या संपूर्ण आंदोलनाचा मुख्य चेहरा ठरलेला विद्यार्थी नेता विवेकानंद पाटील याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या ताज्या व्हिडीओमध्ये विवेकानंद पाटील आंदोलनस्थळी जमलेल्या विद्यार्थ्यांसमोर अध्यक्ष विवेक भीमनवार यांची अधिकृत सोशल मीडिया पोस्ट (ट्विट) वाचून दाखवताना दिसत आहे। या पोस्टमध्ये भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जात असल्याचे जाहीर केले आहे.
शिपायापासून ते आजी-माजी अध्यक्षांपर्यंत सर्वांची कसून चौकशी केली जाणार
MPSC परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीची प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, या आयोगाच्या सचिवपदी कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, आयोगाच्या शिपायापासून ते आजी-माजी अध्यक्षांपर्यंत सर्वांची कसून चौकशी केली जाणार आहे.
View this post on Instagram
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, पेपरफुटी चौकशी पूर्ण होईपर्यंत निर्णय विद्यार्थ्यांचे 10 दिवसांचे आंदोलन स्थगित
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांना कथित पेपरफुटी आणि परीक्षांमधील अनियमिततेच्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी (11 ऑक्टोबर) रात्री पुण्यात आंदोलनस्थळी ही घोषणा केली. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन तत्त्वतः स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली.
रोहित पवारांनी काढली विद्यार्थ्यांची समजूत
आंदोलनकर्ते विद्यार्थी विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर शेवटपर्यंत ठाम आहेत. राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने आंदोलनस्थळी मोठा पेच निर्माण झाला होता. यावेळी विद्यार्थ्यांची समजूत काढताना आमदार रोहित पवार यांची मोठी कसरत झाली. अखेर सरकारने भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा लेखी निर्णय दिल्यानंतर, रोहित पवारांच्या मध्यस्थीने विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
तुकाराम मुंढेंवर एमपीएससीच्या सचिवपदाची जबाबदारी
एवढंच नाही तर, सुधारणा समिती सचिवपदी आयएएस तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निरोपानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी ही मोठी घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून, धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांच्याकडे एमपीएससीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.








