दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आता थेट स्वयंरोजगाराची ‘चावी’ देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. पावसाचा लहरीपणा आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे होणारा आर्थिक फटका कमी करण्यासाठी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल एक लाख प्रवासी रिक्षा देण्याची मोठी घोषणा सरकारने केली आहे. ९ फेब्रुवारीपासून लागू ही योजना लागू होणार आहे.

शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी

शेतीचा बिनभरवशाचा व्यवहार आणि पावसाची अनिश्चिततेचा फटका शेतकऱ्यांना कमी बसावा आणि शेतीवरील आर्थिक अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांत ‘अनाथांचा नाथ.. दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ राबवण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या योजनेंतर्गत तब्बल १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.

९ फेब्रुवारीपासून राज्यात लागू होणार योजना

राज्यातील ३०८ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना रिक्षा देण्याचा परिवहन विभागाचा निर्णय घेतला असल्याची माहिती आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दरवर्षी २० हजार याप्रमाणे पाच वर्षांत एक लाख शेतकऱ्यांना रिक्षा देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रिक्षासाठी १० टक्के अनुदान आणि ९० टक्के कर्ज मिळणार असून, शेतकऱ्यांना केवळ ८०० रुपयांची सदस्यत्व पावती काढावी लागणार आहे. ही महत्वाकांक्षी ‘ अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ ९ फेब्रुवारीपासून राज्यात लागू होणार असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने निर्णय

मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाच्या परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालत कल्याणकारी मंडळामार्फत ‘अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ राबविण्याचा येणार आहे.

येत्या पाच वर्षांत १ लाख रिक्षांचे वाटप करण्यात येणार

दुष्काळाग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजनेंतर्गत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाताला मिळणार रोजगाराचे नवे साधन मिळणार आहे. येत्या पाच वर्षांत १ लाख रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील ३१० पेक्षा अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेतून दिलासा मिळणार आहे. यासाठी ९० टक्के बँक कर्ज, तर १० टक्के आर्थिक मदत कल्याणकारी मंडळाकडून मिळणार असल्याचेही माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याधीही दिवाळीपूर्वी 4 नोव्हेंबर रोजी दुष्काळ दौऱ्यावर निघाले असता, सोलापुरातूनच…

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या आवारात काल (२६ नोव्हेंबर २०२६ ) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडलेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या हल्ल्यात ३५ वर्षीय मंदार किवळेवर…

    Leave a Reply

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी