शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याधीही दिवाळीपूर्वी 4 नोव्हेंबर रोजी दुष्काळ दौऱ्यावर निघाले असता, सोलापुरातूनच शरद पवार थेट रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर, उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या निवासस्थानी दाखल झाले होते. आता, पुन्हा एकदा त्यांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले असावे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. शरद पवार यांची प्रकृती सध्या उत्तम असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक अर्धवट सोडून तातडीने ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हेदेखील शरद पवार यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे पवार यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

साधारण 15 दिवसांपूर्वीही त्यांची प्रकृती बिघडल्यानं  ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं

शरद पवार यांच्या प्रकृतीची गेल्या काही दिवसांपासून नियमित काळजी घेतली जात आहे. साधारण 15 दिवसांपूर्वीही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, आज पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले.

रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे धावल्या

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षाच्या संघटनात्मक आणि आगामी राजकीय रणनीतीसंदर्भात चर्चा सुरू होती.

मात्र, वडील शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे यांनी बैठक सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोणताही विलंब न करता ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

15 दिवसांपूर्वीही प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचार

दरम्यान, शरद पवार यांना यापूर्वीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. साधारण 15 दिवसांपूर्वी, दिवाळीच्या काळात त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या आवारात काल (२६ नोव्हेंबर २०२६ ) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडलेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या हल्ल्यात ३५ वर्षीय मंदार किवळेवर…

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    यंदा हिवाळी अधिवेशनात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांना ब्रेक लागणार आहे. पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा अधिवेशनात पोहोचणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि पत्रकारांना नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळी…

    Leave a Reply

    You Missed

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा