पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या खर्चांवरून विरोधकांनी अनेकदा सरकारवर जोरदार टीकाही केल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण सध्या चर्चा होतेय ती सहा वर्षांत मोदींच्या परदेश दौऱ्यांवर खर्च झालेल्या करोडो रुपयांची. मोदींच्या 2021 पासून आतापर्यंतच्या परदेश दौऱ्यावर तब्बल 550 कोटींहून अधिक खर्च कऱण्यात आल्याचं म्हटलं जातं आहे. तर मागील वर्षी म्हणजेत 2025मध्ये मोदींनी 23 परदेश दौरे केलेत त्यात 180 कोटींहून अधिक खर्च झालाय. मोदींच्या या परदेश दौऱ्यांमुळे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत होत असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वर्षातील परदेश दौऱ्यांच्या खर्चाची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वर्षातील परदेश दौऱ्यांच्या खर्चाची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, 2026 मध्ये आतापर्यंत पंतप्रधानांच्या दौऱ्यांवर 74.58 कोटी रुपये खर्च झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै महिन्यांपर्यंतची आकडेवारी सादर केली आहे. या खर्चात, नॉर्वे दौऱ्यासाठी सर्वाधिक रक्कम वापरली गेल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदींच्या नॉर्वे दौऱ्यावर 17.46 कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

जुलैपर्यंत पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर एकूण एवढे कोटी खर्च

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चाबाबत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि सीपीआयचे खासदार व्ही.शिवदासन यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला लेखी उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने मोदींच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या खर्चांवरून विरोधकांनी अनेकदा टीका केली आहे. या वर्षी जुलैपर्यंत पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर एकूण ७४ कोटी ५८ लाख ९३ हजार ७९७ रुपये खर्च झाले असल्याची माहिती मिळत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेला पुढे माहिती दिली की,या दौऱ्यांचं मुख्य उद्धीष्ट संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, अवकाश सहकार्य, गतिशीलता आणि स्थलांतर, हवामान कृती आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

दौऱ्यांचा उद्देश नेमका काय होता?

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, आशिया, युरोप, आफ्रिका, मध्य पूर्व, ओशिनिया आणि अमेरिका खंडांतील देशांसोबत भारताची द्विपक्षीय भागीदारी मजबूत करणे आणि सहकार्य वाढवणे, हा या करारांचा उद्देश आहे.

यामध्ये संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक,डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, अवकाश सहकार्य, गतिशीलता आणि स्थलांतर, हवामान कृती आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चाबाबत दिलेली माहिती

2026 मध्ये जुलैपर्यंत पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर सुमारे 74.58 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
2021 ते जुलै 2026 या कालावधीत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर 557 कोटी रुपये खर्च झाल्याचे सरकारने सांगितले आहे.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि सीपीआयचे खासदार व्ही. शिवदासन यांनी याबाबत प्रश्न विचारले होते.
परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तर देत दौऱ्यांच्या खर्चाची माहिती दिली.
यावर्षी आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 देशांना भेटी दिल्याची माहिती आहे.
पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चावरून विरोधकांकडून यापूर्वीही टीका करण्यात आली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून एका शाळेनं चक्क त्याला ५० रुपयांचा दंड आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरा रोड मधील अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळेतील एका विद्यार्थ्याने मेथीची भाजी…

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील एका पोलीस अधिकाऱ्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ५७ वर्षे पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे असं त्यांचं नाव असून ड्युटीवर असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं अन्…

    Leave a Reply

    You Missed

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर