तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाल्यापासून एफडीए विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळयुक्त पदार्थ असो, धान्य,दारू असो किंवा थेट हॉटेलचे परवाने रद्द करणं असो. तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांत गुटखा, भेसळ, पनीर, औषधे आणि हॉटेल्सवरील अनियमितता आणि बेकायदेशीरबाबत ठेवत कारवाई करण्यात आली आहे. तर आता एफडीएने IIT बॉम्बे कॅम्पसकडे मोर्चा वळवला असून दोन कँटीनवर FDA ने कारवाई केली आहे.

आयआयटी मुंबईच्या कॅन्टिनवर कारवाई

एफडीएकडे आलेल्या तक्रारीनुसार आयआयटी मुंबई, पवई येथे ३ हॉस्टेल मेसच्या तपासण्या करण्यात आल्या. तपासणी दरम्यान दोन ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायद्या अंतर्गत बंधनकारक असल्येल्या अन्न परवाना , नोंदणी नसल्याचं आढळून आल्याने सदर दोन मेस येथील अन्न व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर तिसऱ्या मेसमध्ये आढळून अल्येल्या त्रुटींच्या अनुषंगाने सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे.

कँटिन चालकांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश

तक्रारीनंतर FDA अधिकाऱ्यांनी IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये तपासणी केली, तपासणीत परवाना आणि अन्न सुरक्षा नियमांतील त्रुटी उघड झाल्यानंतर संबंधित कँटिन चालकांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहे, तसेच प्रकरणाचा पुढील तपास FDA कडून सुरू आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या कारवाया; या हॉटेलांचे परवाने रद्द

मुंबईतील चार हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. यामध्ये दादरमधील Eat Nino या हॉटेलचा समावेश आहे. इथं तपासणी दरम्यान अस्वच्छ परिस्थिती, कीटकांचा वावर, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचा अभाव, अन्नाची आणि पिण्याच्या पाण्याची अनिवार्य चाचणी केल्याच्या नोंदी नसणे, FOSTAC प्रशिक्षण व वैद्यकीय नोंदी उपलब्ध नसणे, तसेच GMP आणि GHP पद्धतींची अंमलबजावणी न करणे, इ. उल्लंघने आढळून आल्यामुळे परवाना निलंबन करण्यात आले.

कुर्ला वेस्ट येथील साऊत इंडियन डोसा कॉर्नरवरही कारवाई

दरम्यान, कुर्ला वेस्ट येथील साऊत इंडियन डोसा कॉर्नरवरही कारवाई करण्यात आली. सदर हॉटेलच्या तपासणी दरम्यान कचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी/लसीकरणाच्या नोंदी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले नाही तसेच प्रशिक्षणाच्या नोंदी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. उपकरणे व आस्थापनेची स्वच्छता निर्धारित स्वच्छता कार्यक्रमानुसार करण्यात येत नसल्याचे आढळून आले. आवश्यक अभिलेख (Records) व दस्तऐवज उपलब्ध ठेवण्यात व जतन करण्यात आलेले नाहीत, इ. सुधारणा नोटीस मध्ये नमूद केलेल्या तुटींची विहित मुदतीत पूर्तता न केल्यामुळे परवाना निलंबन करण्यात आला आहे.

पान मसाल्याविरोधातील कारवाईत 19 एफआयआर दाखल

प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याविरोधातील कारवाईत 19 एफआयआर दाखल करण्यात आले असून 20.29 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. तर दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी, मसाले, खाद्यतेल आदी अन्नपदार्थांवर कारवाई करत 2.62 कोटींचा साठा जप्त करण्यात आला. याच मोहिमेत राज्यभरातील 63 हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 38 आस्थापनांना सुधारणा नोटीस, तर 7 आस्थापनांचे एफएसएसएआय परवाने निलंबित करण्यात आले.

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला होता. मुख्यमंत्र्यांनी रामभाऊ बालपांडे कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली, त्यांच्याकडे मुक्काम केला तो अनुभव…

डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

ऐन दिवाळीत ठाणे एटीएसने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने डोंबिवलीतून कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला अटक केली आहे. या अटकेच्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ठाणे एटीएसने कुप्रसिद्ध फरार झारखंडमधील नक्षलवाद्याला अटक केली…

Leave a Reply

You Missed

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

“१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

“१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण याचा भारताला काय फायदा होणार?

डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का;  पण याचा भारताला काय फायदा होणार?