बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी उसळली आहे. दरवर्षी देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. त्यात आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने लालबाग राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळतेय. लालबाग-परळचा परिसर भक्तांनी फुलून गेलेलं पाहायला मिळालं आहे. एवढंच नाही तर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.

लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग तब्बल 10 किलोमीटर पेक्षा जास्त लांब 

लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग तब्बल 10 किलोमीटर पेक्षा जास्त लांब गेल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे गणेशभक्तांनी लालबागचा राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी केली आहे. लालबाग मार्केट ते भायखळा रेल्वे स्टेशनपर्यंत ही दर्शन रांग पोहचली आहे. रविवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची सर्वाधिक गर्दी होत असलेली पाहायला मिळत आहे. शनिवारपासूनच लालबाग, परळ, काळाचौकी परिसरात मोठी गर्दी आहे. काळाचौकी येथे महागणपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांसोबत मोठी एक दुर्घटना घडली.

लालबागमध्ये गर्दीचं नियोजन करताना पोलीस यंत्रणा कसं असेल?

शनिवारपासूनच लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसर भाविकांनी गजबजलेला आहे. आज रविवारी मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा मोठा कस लागत आहे. शनिवारी रात्री काळाचौकी येथील महागणपती मंडळाजवळ घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, आज लालबाग परिसरात सुरक्षा व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन अधिक कडक करण्यात आले आहे.

लालबाग मार्केटमध्ये कोळी बांधवांचा पारंपरिक जल्लोष

एकीकडे दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे असलेल्या भक्तांचा उत्साह कायम असतानाच, दुसरीकडे लालबाग मार्केटमध्ये कोळी बांधवांचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. गणेशोत्सव काळात कोळी महिलांना लालबागच्या पूजेचा विशेष मान दिला जातो. याच परंपरेचे पालन करत कोळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले. बँड-वाज्याच्या तालावर नृत्य करत कोळी महिलांनी बाप्पाची पूजा करून जल्लोष साजरा केला.

गणेश गल्लीच्या ‘मुंबईच्या राजा’ला १०१ अमेरिकन डॉलरचा हार

यंदाच्या गणेशोत्सवात भारतीय चलनासोबतच परदेशी चलनाचे दान देण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध ‘गणेश गल्ली’ येथील ‘मुंबईच्या राजा’च्या पूजेच्या मूर्तीला एका भाविकाने १०१ अमेरिकन डॉलरचा अत्यंत आकर्षक हार अर्पण केला आहे. यापूर्वी लालबागच्या राजालाही एका भक्ताने डॉलरचा हार अर्पण केला होता. यंदा भाविकांकडून भरभरून अर्पण केले जाणारे विदेशी चलन आणि मौल्यवान भेटवस्तू सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत लोक कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने भव्य कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात लेखक गोरक्षनाथ पवार लिखित ‘चमकणारे दिवे (भाग २)’ या पुस्तकाचा…

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईच्या काळाचौकी येथील गणेशोत्सवाला गालबोट लागेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात काळाचौकी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या…

    Leave a Reply

    You Missed

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह