सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यामुळे लहान मुलां तर याचं योग्य ज्ञान असणं फार महत्त्वाचं झालं आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुले व विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे मिळावेत आणि ते जबाबदार नागरिक बनावेत, या उद्देशाने ‘क्विक हील फाउंडेशन’ आणि गोरेगाव पश्चिम येथील ‘पटकर-वर्दै महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष सायबर जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

गोरेगाव पश्चिम येथील रवींद्र भारती शाळेत ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या प्रमुख उपक्रमाअंतर्गत हे सत्र पार पडलं. रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दै महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सायबर जनजागृतीचे धडे देण्यात आले.

‘स्टुडंट सायबर वॉरियर्स’कडून मार्गदर्शन

पटकर-वर्दै महाविद्यालयाच्या प्रशिक्षित ‘स्टुडंट सायबर वॉरियर्स’ उपासना विजय माळी आणि समीक्षा नारायण उंबाळकर यांनी या सत्राचे नेतृत्व केलं. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या आणि रंजक भाषेत काही महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केलं. जसं की,

डेटा संरक्षण आणि गोपनीयता: ऑनलाइन जगात आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित कशी ठेवावी.

ऑनलाइन फसवणूक ओळखणे: फिचिंग ,फेक ऑफर्स आणि सायबर फ्रॉडपासून कसे सावध राहावे.

सोशल मीडियाचा सुरक्षित वापर: अनोळखी लोकांशी संवाद साधताना कशी काळजी घ्यायची हे समजावून सांगितलं.

सायबर गुन्ह्यांची तक्रार: सायबर बुलिंग किंवा फसवणूक झाल्यास योग्य ठिकाणी तक्रार कशी करावी याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सत्रादरम्यान प्रत्यक्ष जीवनातील विविध उदाहरणे आणि संवादात्मक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर विश्वातील धोक्यांची जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला , प्रश्न विचारले आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

शाळा व्यवस्थापनाकडून उपक्रमाचे कौतुक

रवींद्र भारती शाळेच्या व्यवस्थापनाने या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल क्विक हील फाउंडेशन आणि पटकर-वर्दै महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे महत्त्व समजण्यास मदत होते आणि ते इंटरनेटचा वापर अधिक जबाबदारीने करू शकतात, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू