हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाला अनुकूल वातावरण असून. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. देशभरात पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार तर, मुंबईतही राहणार पावसाचा जोर 

हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध भागांसाठी हवामानाचे इशारे जारी केले असून, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच आज मुंबईत दाट रिमझिम पावसाची शक्यता ९९% वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे हवामान दमट राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात कमाल तापमान २९°C पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान २६°C राहण्याचा अंदाज आहे.

तसेच ९ ऑगस्ट रोजी विशेषतः १२ वाजण्याच्या सुमारास, आकाशात थोडी मोकळीक दिसेल, परंतु पावसाची शक्यता ९९% कायम राहील. दुपारी ३ वाजता पावसाचा जोर वाढण्याची आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तो हलका होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, रात्री ९ नंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज

महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, गोदिंया, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच काही भागात 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकते. यासोबतच जोरदार पाऊसही असेल. मात्र, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही राज्यांत गारपिटीचीही शक्यता आहे. जोरदार वाऱ्यांमुळे मोठी झाडे पडू शकतात. गारपिटीचा इशारा देण्यात आला. गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले

मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. जायकवाडी धरणातील भरलेल्या पाण्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर आणि उद्योगावरील संकट आता पूर्णत टळले आहे.

दरम्यान भारतात राजस्थानच्या अनुपगढपासून दिल्ली, सिंधी ते पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

Leave a Reply

You Missed

सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

“काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

“काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू