नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

‘सैराट’ चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. पण तिचं विषेश आकर्षण ठरलं ते म्हणजे तिच्या साध्यापणाचं. रिंकू राजगुरू ही नक्कीच घराघरात सेलिब्रिटी म्हणून,महाराष्ट्राचा क्रश म्हणून पोहोचली आहे. पण तरी देखील कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट न घेता अगदी सर्वांप्रमाणे रांगेत उभं राहून तिने राजाचं दर्शन घेतलं.

रिंकूच्या साध्या अंदाजावर चाहते फिदा 

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी सामान्य जनतेपासून ते बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचीच रीघ लागलेली असते. अशा वेळी अनेक स्टार्स विशेष सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांच्या गराड्यात अवघ्या काही मिनिटांत दर्शन घेऊन निघून जातात. पण त्याचवेळी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सामान्य जनतेसह रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. रिंकूच्या याच साध्या अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. तसेच तिचं कौतुकही करत आहेत.

सामान्यांशी मारल्या मनमोकळ्या गप्पा

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रिंकूने तपकिरी रंगाची कॉटनची साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. तिने गळ्यात माळ, नाकात नथ आणि कानात नाजूक कानातले असा सिंपल लूक केला आहे. या साधेपणातही ती अतिशय सुंदर दिसत असून तिने त्या गर्दीतही तिचा तो साधेपणा जपला.

रांगेत उभ्या असलेल्या सर्वसामान्य भाविकांसह तिने मनमोकळ्या गप्पाही मारल्या

एवढंच नाही तर दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या सर्वसामान्य भाविकांसह तिने मनमोकळ्या गप्पाही मारल्या. मराठी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव असलेली रिंकू आपण सेलिब्रिटी असल्याचं न भासवता रांगेत उभ्या असणाऱ्या शेजारच्या लोकांशी आणि महिलांशी अतिशय आपुलकीने आणि हसतमुखाने गप्पा मारताना दिसत आहे. तिच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे.

रिंकूनं पुन्हा एकदा सर्वांच मन जिंकलं 

वेगवेगळ्या सिनेमांमधून रिंकु राजगुरू नेहमीच आपल्या साधेपणाने सर्वांचं लक्ष वेधून घेते. रिंकू सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अनेकदा ती चाहत्यांसोबत वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहतेही तिला भरभरून प्रेम देतात. दरम्यान, लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आलेल्या रिंकूच्या साधेपणाने सर्वांचच मन जिंकलं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    उत्सव, धार्मिक कार्यक्रम साजरे करताना मात्र त्यासाठी ध्वनी, वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने…

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवर हटके स्टाईलमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडीओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा इम्पॅक्ट इतका झाला आहे…

    Leave a Reply

    You Missed

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार