रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

उत्सव, धार्मिक कार्यक्रम साजरे करताना मात्र त्यासाठी ध्वनी, वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्बंध लागू केले आहेत.मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास संपूर्ण बंदी घातली.

मुंबई उच्च न्यायालयाने  सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास संपूर्ण बंदी घातली 

उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर पूर्णत: बंदी घालण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले आहेत.धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग करून ध्वनी व वायुप्रदूषण करणे आणि नागरिकांना वेठीस धरणे खपवून घेतले जाणार नाही, असा कडक इशारा हायकोर्टाने दिला आहे.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने मिरवणुकांदरम्यान निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादांचे प्रशासनाने काटेकोरपणे पालन करावे आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे स्पष्टपणे आदेश दिले आहेत. उत्सवांच्या नावाखाली नागरिकांना मूक सहनशील बनवता येणार नाही, असं सांगत आम्ही कशाच्याही विरोधात नाही, परंतु कायद्याचं पालन केलंच पाहिजे असंही खंडपीठाने नमूद केलं आहे.

मर्यादांचे वारंवार उल्लंघन झालं

उत्सवांच्या मिरवणुकीतील ध्वनी आणि वायुप्रदूषणाबाबत न्यायालयाने स्वत:हून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. ठाण्यातील ध्वनिप्रदूषणाबाबत यापूर्वी जनहित याचिका दाखल करणारे डॉ. महेश बेडेकर यांच्या वतीने ॲड. एस. एम. गोरवाडकर यांनी पाच-सहा दिवसांत गोळा केलेली आकडेवारी सादर केली, ज्यामध्ये ठरवून दिलेल्या मर्यादांचे वारंवार उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

लाऊडस्पीकर, डीजेचा वापर टाळणे

यावर धार्मिक मिरवणुकांमध्ये अनेक लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीम्सच्या आवश्यकतेवर खंडपीठाने प्रश्न उपस्थित करत त्यांचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. लाऊडस्पीकर आणि फटाक्यांचा वापर करून आपल्याला देवाकडून अतिरिक्त आशीर्वाद मिळणार आहेत का? असा सवाल करत न्यायालयाने पंढरपूरच्या वारकऱ्यांचे उदाहरण दिले. मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असूनही लाऊडस्पीकर किंवा अतिरेकी आवाजाशिवाय हा धार्मिक सोहळा शांततेत पार पडतो, असे स्पष्ट केले.

ध्वनीप्रदूषण टाळून उत्सव करा साजरा

सण, उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही,याची काळजी का घेतली जात नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच एकाच वेळी अनेक मिरवणुका निघतात आणि त्यानंतर होणाऱ्या आवाजाची कल्पना करा. हे समजणं पूर्णपणे अनावश्यक आहे. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडल्याने विषारी वायुप्रदूषण वाढते. विशेषतः मुंबईत धुके आणि प्रदूषण वाढण्याचा कालावधी सुरू होत असताना याचा अधिक परिणाम होतो, असेही न्यायालयाने म्हटलं आहे.

एखाद्याच्या जीवाची किंवा आरोग्याची किंमत मोजून उत्सव साजरे करता येणार नाही

विशेषत: ९ ते २६ सप्टेंबरदरम्यान जमावबंदीचे आदेश तसेच फटाके फोडण्यास आणि लाऊडस्पीकरवरही बंदी असताना, या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला. त्यामुळे हे निर्देश सर्व सणांना लागू असतील. धार्मिक भावना, सार्वजनिक सुरक्षितता आणि पर्यावरणीय चिंता यांच्यात समतोल राखणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने अधोरेखित केले. एखाद्याच्या जीवाची किंवा आरोग्याची किंमत मोजून उत्सव साजरे करता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

लाऊडस्पीकरसाठी लेखी परवानगी आवश्यक

सदर याचिकेत न्यायालय मित्र ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्त केलेले ज्येष्ठ वकील ॲस्पी चिनॉय यांनी पाच पानी निवेदन सादर केले. ‘उत्सवाचा कालावधी १० वरून १५ दिवस वाढवला तरी ध्वनी प्रदूषणाचे नियम शिथिल होत नाहीत’, असे त्यांनी नमूद केले. लाऊडस्पीकरसाठी लेखी परवानगी आवश्यक असून ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादा लागूच राहतात. उत्सवांदरम्यान ९०, ९५ आणि १०० डेसिबलपर्यंतची नोंद झाली असून निवासी भागात ५५ डेसिबल आणि व्यावसायिक भागात ६५ डेसिबलची मर्यादा असल्याचे चिनॉय यांनी निदर्शनास आणून दिले आहेत.

दरम्यान याबाबत कोणही नियम तोडले किंवा आदेशाचं पालन नाही केलं तर नक्कीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    ‘सैराट’ चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. पण तिचं विषेश आकर्षण ठरलं ते म्हणजे तिच्या साध्यापणाचं. रिंकू राजगुरू ही नक्कीच घराघरात…

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवर हटके स्टाईलमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडीओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा इम्पॅक्ट इतका झाला आहे…

    Leave a Reply

    You Missed

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार