रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

रविवारी मध्य रेल्वेने रविवार दि.९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात आला आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मुख्य मार्गावर माटुंगा- मुलुंड स्थानकाच्या दरम्यान आणि हार्बर मार्गावर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सीएसएमटी, मुंबई आणि चुनाभट्टी-वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना लोकलचा प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे प्रवसांची डोकेदुखी वाढू शकते.

अप आणि डाऊन मार्गावर 

माटुंगा–मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.५ वाजल्यापासून ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत डाऊन धिम्या मार्गावर सीएसएमटी, मुंबईतून सकाळी १०.१४ वाजल्यापासून ते दुपारी ३.३२ दरम्यान धावणाऱ्या लोक‘मेगा ब्लॉक’ल फेऱ्यांना माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन फास्ट मार्गिकेवर वळवण्यात येणार आहे. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप तसेच मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंडहून पुन्हा या लोकल डाऊन धिम्या मार्गावर चालवल्या जातील आणि आपल्या गंतव्य स्थानकावर १५ मिनिटांच्या उशीराने पोहचतील.

लोकल १५ ते २० मिनिटे उशीरा असतील.

अप स्लो मार्गावर ठाण्याहून सकाळी ११.७ वाजल्यापासून ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत धावणाऱ्या लोकल फेऱ्या मुलुंडहून अप फास्ट लाईनवर वळवल्या जातील. या ट्रेन मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबतील. त्यानंतर माटुंगावरुन पुन्हा अप धिम्या मार्गावर या लोकल चालवल्या जातील तसेच १५ ते २० मिनिटे उशीरा असतील.

दरम्यान सकाळी ११.०० वाजता ते दुपारी ५.०० दरम्यान सीएसएमटीहून प्रस्थान करणाऱ्या तसेच सीएसएमटीला पोहचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल आपल्या निर्धारित वेळेच्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने गंतव्य स्थानकावर पोहचतील.

हार्बर लाईनवर कसा असणार ‘मेगा ब्लॉक’?

सीएसएमटी–चुनाभट्टी – वांद्रे डाऊन हार्बर लाईन ११.४० वाजल्यापासून ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत तर, चुनाभट्टी-वांद्रे–सीएसएमटी अप हार्बर लाईनवर सकाळी ११.१० वाजल्यापासून ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत बंद असणार आहे.

सीएसएमटी, मुंबई ते वाशी-बेलापुर-पनवेलसाठी सकाळी ११.१६ वाजल्यापासून ते सायंकाळी ४.४७ वाजताच्या दरम्यान धावणाऱ्या डाऊन हार्बर लोकल तसेच वांद्रे-गोरेगावसाठी सकाळी १०.४८ वाजल्यापासून ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत चालणाऱ्या डाऊन हार्बर लोकल फेऱ्या रद्द असणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू