रोजी सकाळी सुमारे ०९:३० वाजता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कांजूरमार्ग स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी 10 वाजता मध्य रेल्वेमार्गावरील सिग्नल यंत्रणेत प्रचंड मोठा बिघाड झाला आणि मुंबईची लाईफ लाईन बंद पडली होती. संध्याकाळी सव्वा ६ ते साडे ६ च्या दरम्यान रेल्वे सुरळीत करण्यात आली. मध्य रेल्वे प्रशासनाला हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी बराच वेळ लागला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
३ ते ४ तास रेल्वेसेवा उशीराने सुरु
माञ जेव्हा तांञिक बिघाड दुरुस्त झाला तेव्हा मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक स्टेशनवर प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त गर्दी तर दादर, घाटकोपर, तसेच ठाणे स्टेशनवर पाहायला मिळत आहे. जवळपास ३ ते ४ तास रेल्वेसेवा उशीराने सुरु आहे. त्यामुळे प्रवासी जी लोकल येईल त्या लोकलने घरी जाण्याची धडपड करत होते. पण त्यामुळे धक्काबुक्की सारख्या घटनाही घडल्याचं समोर आलं आहे.
दरवाजा रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून बंद केल्यानं गोंधळ निर्माण झाला.
त्यामुळे या तांञिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर लोकल सुरळीत झाली खरी पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ठाणे स्टेशनवर प्रवाशांमध्ये गर्दीमुळे संताप निर्माण झाला होता. त्यातच ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर कल्याणला जाणाऱ्या लोकलचा दरवाजा रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून बंद केल्यानं गोंधळ निर्माण झाला. स्टेशनवर असलेल्या प्रवाशांनी विनंती करूनही तो दरवाजा उडण्यात आला नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या मुजोरपणामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
ठाणे स्टेशनवर हाणामारी
या सर्व गोंधळामुळे ठाणे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाल्यानं प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण एकंदरितच आजच्या रेल्वेच्या तांञिक बिघाडमुळे सर्वच मुंबईकरांचे हाल झालेत.








