मोठी अपडेट! मुंबई लोकलचा खोळंबा सुरुच, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार?

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी 10 वाजता मध्य रेल्वेमार्गावरील सिग्नल यंत्रणेत प्रचंड मोठा बिघाड झाला आणि मुंबईची लाईफ लाईन बंद पडली ती अद्यापही सुरु झालेली नाही. आता संध्याकाळी ४ वाजून गेले तरी अजूनही रेल्वे सुरुळीत झालेली नाही. मध्य रेल्वे प्रशासनाला हा बिघाड दुरुस्त करता आलेला नाही. त्यामुळे गेल्या पाच तासांपासून मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची धीम्या आणि जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होण्याची शक्यता

मध्य रेल्वेमार्गावर सध्या रेल्वे ट्रॅकवर ट्रेन एकापाठोपाठ एक उभ्या आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेनचाही समावेश आहे. सकाळपासून हा खोळंबा झाला आहे. कांजूरमार्ग येथील सिग्नल यंत्रणेच्या केबिनमध्ये आग लागल्याने ठाणे ते विक्रोळी दरम्यान संपूर्ण सिग्नल यंत्रणा ठप्प झाली आहे. सकाळी 10 वाजता मुलुंड ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर कांजूरमार्ग येथील सिग्नल केबिनमध्ये आग लागली आणि ठाणे ते विक्रोळी पर्यंत सिग्नल यंत्रणा बंद झाली. अजून सुमारे तीन ते चार तास इथल्या केबल बदलण्यास लागणार आहे. तर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होण्याची शक्यता आहे.

अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन पुढचे स्थानक गाठले

सकाळी दहा वाजता सिग्नल केबिनमध्ये आग लागल्यानंतर कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाच्या पुढील सर्व सिग्नल एका फटक्यात बंद पडले. त्यामुळे मोटरमन्सला लोकल ट्रेन जागेवर थांबवाव्या लागल्या. एक-दोन तास उलटूनही ट्रेन एकाच जागी उभ्या असल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन पुढचे स्थानक गाठले. येत्या काही तासांमध्ये सिग्नल यंत्रणा सुरळीत होऊन सुरु झाली तरी आतापर्यंतच्या लोकल ट्रेनचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. त्यामुळे संध्याकाळी गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. कालच मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक ठेवण्यात आला होता. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी इतका मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेने मेगाब्लॉकच्या काळात नक्की काय केले, असा सवाल विचारला जात आहे. प्रवाशांकडून मध्य रेल्वेच्या कारभाराविषयी प्रचंड संतापही व्यक्त केला जात आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकुळच्या निकालानंतर कोरम पूर्ण होत नसल्याने चार शासन नियुक्त संचालकाच्या निर्णयावरून वातावरण तापलं आहे. या निर्णयाविरोधात पुकारलेल्या आंदोलनात आंदोलक…

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    मुंबईमध्ये उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे शहराच्या वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीच्या रात्री झालेल्या…

    Leave a Reply

    You Missed

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका