मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली आज २ ऑक्टोबर २०२६ गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून मुंबईतील शिवाजी पार्क गेट क्रमांक ६ येथे हे आंदोलन करण्याचं ठरलं आहे. माञ मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. तरीही आंदोलनावर ठाम असल्याचे सीजेपीने स्पष्ट केले आहे.

शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली

आंदोलनाच्या शक्यतेमुळे शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान काही वेळापूर्वी, सीजेपीचे संयोजक अभिजित दीपके यांना थोड्या वेळासाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळात त्यांची सुटका करण्यात आली.

संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कमध्ये आंदोलन

सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी देखील सोशल मीडियावर एक संदेश शेअर करून संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कमध्ये एकत्र येण्याचे अंतिम आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले, “ज्ञानेश, आता पुरे झाले.” छत्रपती शिवाजी पार्कच्या आसपासच्या रेल्वे स्थानकांवरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.या आंदोलनाचे पडसाद आता दिल्लीतही पाहायाला मिळत आहेत.

दिल्लीतील जंतर मंतर परिसरात आंदोलनाला सुरुवात

सकाळी ११ वाजल्यापासून दिल्लीतील जंतर मंतर परिसरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते.दिल्लीतील विरोध पक्ष, आप आणि विद्यार्थी संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत. आप नेते सौरभ भारद्वाज जंतर मंतरवर पोहोचताच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरु

त्यामुऴे पुन्हा एकदा दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचे नारे दिसत असून पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून जंतर मंतरवर पोलीस आणि आरएएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर जवळच्या ११ मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आले आहेत. यामध्ये जनपथ, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट, राजीव चौक, सेवा तीर्थ, मंडी हाऊस आणि लोक कल्याण मार्ग मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

दिल्लीत कलम १६३ लागू

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतर मंतर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आठ ते नऊ झोनमध्ये विभागण्यात आला असून, सुरक्षेची देखरेख करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी तैनात करण्यात आला आहे. तसेच दिल्लीत कलम १६३ लागू, निदर्शने, मिरवणुका आणि सभांवर बंदी घालण्यात आली आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतर मंतर येथे होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीत भारतीय नागरी सेवा संहितेचे (BNSS) कलम १६३ लागू करण्यात आले आहे. यानुसार निदर्शने, मिरवणुका किंवा सभा घेण्यास मनाई आहे. तसेच, लोकांच्या एकत्र येण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

CJP च्या प्रमुख मागण्या
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल करणे, तसेच मतदार याद्यांमधील ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया गोठवणे या प्रमुख मागण्या आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी cjp चे मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारने शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नव्हती. तेव्हा अशा परिस्थितीत, सीजेपीने शिवाजी पार्कच्या बाहेर…

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपासूनच महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल जाणवू लागला आहे. राज्यात पावसाची उघडीप मिळताच उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून, अनेक भागांत तापमानात वाढ झाली आहे. सकाळपासूनच उकाडा जाणवत असून…

    Leave a Reply

    You Missed

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल