पुणेकरांनो, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी पाहा! अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे वाहतुकीचे नियम बदलले; ‘हे’ रस्ते राहणार बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौरा आहे. दौऱ्यानिमित्त आज म्हणजेच रविवारी आणि सोमवारी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे वाहतूक बदल करण्यात आले असून वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी नागरिकांना केलं आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

कोणते रस्ते राहणार बंद

पुणे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी मॉल ते हॉटेल ब्लू नाईल चौक हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलीस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्कॉन मंदिर आणि ब्लू नाईल चौक येथे आपली वाहने लावावीत.

दोन दिवस ‘नो-पार्किंग’ असणारे प्रमुख मार्ग

लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी (मुंढवा) या रस्त्यावर दोन्ही दिवस सर्व प्रकारची वाहने लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासोबतच इतर काही भागांतही पार्किंगला मनाई असेल. यात कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड, जहांगीर हॉस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरू मेमोरियल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), वेधशाळेजवळील खुडे चौक, संगमवाडी ते येरवड्यातील शाहदावलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता आणि ५०९ चौक ते लोहगाव हवाई दलाचा तळ याचा समावेश आहे.

सोमवारचे विशेष वाहतूक बदल

अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हॉटेल आणि भरत नाट्य मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई असेल. तसेच, सकाळी ७ वाजल्यानंतर किराड चौक ते नेहरू मेमोरियल हॉल चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौक येथून जीपीओमार्गे हॉटेल ब्लू नाईल चौकात जावे आणि तेथून पुढे आपल्या इच्छितस्थळी प्रस्थान करावे, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    अवघ्या १ तास १० मिनिटांत गाठता मुंबईहून सिंधुदुर्ग! आजपासून थेट विमानसेवा सुरू, पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

    तासंतास प्रवास करण्यापेक्षा आता अवघ्या एक तासात मुंबईहून सिंधुदुर्ग गाठता येणार आहे. कारण नवी मुंबई ते चिपी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 16…

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    पुण्यातील ऐतिहासिक नूतन मराठी विद्यालय (नूमवी) प्रशालेच्या परिसरात आगामी ‘जय श्री राम’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पाकिस्तानचे झेंडे लावून कराची शहराचा सेट उभारल्याने तीव्र वाद निर्माण झाला आहे. शाळेचे संस्थापक विष्णुशास्त्री…

    Leave a Reply

    You Missed

    अवघ्या १ तास १० मिनिटांत गाठता मुंबईहून सिंधुदुर्ग! आजपासून थेट विमानसेवा सुरू, पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

    अवघ्या १ तास १० मिनिटांत गाठता मुंबईहून सिंधुदुर्ग! आजपासून थेट विमानसेवा सुरू, पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

    पुणेकरांनो, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी पाहा! अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे वाहतुकीचे नियम बदलले; ‘हे’ रस्ते राहणार बंद

    पुणेकरांनो, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी पाहा! अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे वाहतुकीचे नियम बदलले; ‘हे’ रस्ते राहणार बंद

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार! ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार!  ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    दिवाळी संपताच नागरिकांच्या खिशाला भुर्दंड; CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

    दिवाळी संपताच नागरिकांच्या खिशाला भुर्दंड; CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला

    मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकलच्या अनाउन्समेंटऐवजी थेट छटपूजेची गाणी; महाराष्ट्राला ‘यूपी-बिहार’ बनवण्याचा घाट? सोशल मीडियावर संतापाची लाट

    मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकलच्या अनाउन्समेंटऐवजी थेट छटपूजेची गाणी; महाराष्ट्राला ‘यूपी-बिहार’ बनवण्याचा घाट? सोशल मीडियावर संतापाची लाट

    रत्नागिरीत भीषण अग्नीतांडव! जैन नगरमधील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ला आग;आगीच्या भीषण लोळांनी परिसर हादरला

    रत्नागिरीत भीषण अग्नीतांडव! जैन नगरमधील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ला आग;आगीच्या भीषण लोळांनी परिसर हादरला

    “आम्हालाही कुटुंब आहे…”! सण-उत्सव आपले, बंदोबस्त माञ पोलिसांचा; पोलिसांच्या हक्कांचा विचार कधी होणार?

    “आम्हालाही कुटुंब आहे…”! सण-उत्सव आपले, बंदोबस्त माञ पोलिसांचा; पोलिसांच्या हक्कांचा विचार कधी होणार?