
दिवाळी संपताच ग्राहकांच्या खिशाला काञी लागली आहे. आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या वाहनचालक आणि गृहिणींचं बजेट आता पुन्हा कोलमडलं आहे. कारण दिवाळी संपते तोच आता CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ
CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरातील वाढ पुणेकरांसह पिंपरी-चिंचवड आणि नाशिकमध्ये झालेली आहे. राञीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने घेतला आहे. त्यानुसार, 12 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत. CNG च्या दरात प्रतिकिलो 1 रुपये 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात CNG चा नवीन दर 99 रुपये 75 पैसे प्रतिकिलो झाला आहे. तर घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG च्या दरात प्रति SCM 1 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे PNG चा नवीन दर 51 रुपये 75 पैसे प्रति SCM असणार आहे.
सप्टेंबर नंतर दुसरी दरवाढ, नवे दर काय?
दरम्यान, दिवाळीच्या आधी सप्टेंबर रोजी दरवाढ झाली होती. आखाती देशामध्ये अजूनही तेल संकट टळलं नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सारखी दरवाढ होता आहे. सप्टेंबरमध्ये CNG प्रति किलो २ रुपयांनी महागला. तर, घरगुती पीएनजीच्या दरातही प्रति SCM १ रुपयांची वाढ केली होती. सध्या देशात सीएनजीला मोठी मागणी असून ही गरज भागवण्यासाठी अतिरिक्त साठा मागवण्यात आल्याचा परिणाम दरावर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरवाढीचा निर्णय का घेण्यात आला ?
गॅसच्या इनपुट खर्चात आणि आयात केलेल्या LNG च्या किमतीत वाढ झाल्यामुळे दरवाढीचा निर्णय घेतल्याचं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, पेट्रोलच्या तुलनेत CNG वापरल्यास 45 टक्के, तर डिझेलच्या तुलनेत 20 टक्क्यांहून अधिक बचत होत असल्याचा दावा MNGL ने केला आहे.
अचानक दरवाढीचा फटका
एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना आता वाहनचालकांसह घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांनाही दरवाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.








