गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकुळच्या निकालानंतर कोरम पूर्ण होत नसल्याने चार शासन नियुक्त संचालकाच्या निर्णयावरून वातावरण तापलं आहे. या निर्णयाविरोधात पुकारलेल्या आंदोलनात आंदोलक जमण्यास सुरूवात झाली आहे.

निर्णयाविरोधात रस्तावरच्या लढाईपासून कोर्टातही लढाईची घोषणा

गोकुळच्या 25 पैकी 13 जागा जिंकलेल्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी निर्णयाविरोधात रस्तावरच्या लढाईपासून कोर्टातही लढाईची घोषणा केली आहे. समविचारी आघाडीचा मोर्चा दसरा चौकातून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका

गोकुळ दूध संघावर चार स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज 9 नोव्हेंबर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात ‘संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला.

गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणारे

कोल्हापुरात काढण्यात आलेल्या मोर्चात महायुतीच्या नेत्याच्या विरोधातील संताप बॅनरबाजीतही दिसून आले. या आंदोलनात कोल्हापुरी पायताण सुद्धा प्रतीकात्मक आणण्यात आलंय. लक्षात ठेवलंय 2029 हे कोल्हापूर हाय, ही संघर्षाची शेवटची दिवाळी असू दे, हे कोल्हापूर हाय, गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणारे, एक खासदार कमी होता म्हणून राजीनामा देणारे अटलजी कुठे? आणि एक संचालक कमी आहे म्हणून चार संचालक नियुक्त करणारे कुठे? असे विविध आशयाचे बॅनर पाहायला मिळत आहे.

कोल्हापूरकरांच्या विविध बॅनरने लक्ष वेधून

कोल्हापुरातील ऐतिहासिक मोर्चावर संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. कोल्हापूरकरांच्या विविध बॅनरने लक्ष वेधून घेतलं आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकामध्ये लावण्यात आलेले पोस्टर्स सुद्धा चांगलेच लक्ष वेधून घेताय. ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चात समविचारी आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चासाठी दसरा चौकात मोठी गर्दी जमली होती. हातात काळे झेंडे घेऊन नागरिकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. कोल्हापुरातील वकिलांनीही या संघर्ष मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शशिकांत पाटील चुयेकर यांच्या अध्यक्षपदी निवडीवरूनही कायदेशीर वाद

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीच्या पॅनेलला 12 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे गोकुळमध्ये समविचारी आघाडीला बहुमत मिळाले होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महायुतीच्या 12 संचालकांनी अनुपस्थित राहिल्याने आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाला. त्यानंतर सतेज पाटील गटाने स्वतंत्र बैठक घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली. या निवडीवरूनही कायदेशीर वाद निर्माण झाला.

सरकारचा निर्णय गोकुळचा ताबा मिळवण्यासाठी असल्याचा सतेज पाटलांचा आरोप

गोकुळमधील सत्तेचा पेच सोडवण्याऐवजी राज्य सरकारने दूध संघाच्या संचालक मंडळावर चार स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने वाद आणखी चिघळला. विशेष म्हणजे, या सदस्यांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीत 13 जागा मिळवलेल्या समविचारी आघाडीच्या बहुमतावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारचा हा निर्णय गोकुळचा ताबा मिळवण्यासाठी असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान

या अध्यादेशाला समविचारी आघाडीकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हानही देण्यात आलं आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार आज संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आले. या मोर्चात समविचारी आघाडीच्या नेत्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले. हातात काळे झेंडे घेऊन सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. कोल्हापुरातील वकिलांनीही मोर्चाला पाठिंबा दिल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झालं.

  • Related Posts

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    मुंबईमध्ये उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे शहराच्या वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीच्या रात्री झालेल्या…

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    यंदा दिवाळीत फटाक्यांबाबत अनेक कडक नियमावली करून देखीव फटाके त्याच संख्येनं सर्वञ वाजवण्यात आले. माञ याचमुळे मुंबईकरांची जीवनवाहीनी असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकलसेवा विस्कळीत होय, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी…

    Leave a Reply

    You Missed

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका