उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

मुंबईमध्ये उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे शहराच्या वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीच्या रात्री झालेल्या जोरदार आतषबाजीमुळे मुंबईतील हवेचा दर्जा अचानक अत्यंत खालावला. काही दिवसांपूर्वी मध्यम स्वरूपात असलेली हवा दिवाळीनंतर ‘धोकादायक’ आणि ‘वाईट’ श्रेणीत पोहोचली आहे.

मुंबईची हवा पुन्हा एकदा दूषित

८ नोव्हेंबर रोजी राज्यभरात दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीमुळे मुंबईची हवा पुन्हा एकदा दूषित झाली असून, प्रचंड वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

हवेची गुणवत्ता अचानक धोक्याच्या पातळीवर पोहोचली

गेल्या वर्षी २०२५ मध्ये मुंबईचा सरासरी AQI १८८ म्हणजेच ‘खराब’ श्रेणीत होता, तर २०२६ मध्ये तो १३२ वर येत ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवला गेला. परंतु, लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतील अनेक भागांत हवेची गुणवत्ता अचानक धोक्याच्या पातळीवर पोहोचली.

अंधेरी परिसरात रात्री ८ वाजता PM ‘पार्टिक्युलेट मॅटर’ २.५ ची पातळी ४२ होती, जी अवघ्या दोन तासांत तब्बल ५९७ वर

याशिवाय, न्यायालयीन कारवाई, ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी आणि विविध जनजागृती मोहिमांमुळे फटाक्यांच्या आवाजावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे पर्यावरण कार्यकर्त्यांचे मत आहे. मात्र, आवाजाची पातळी कमी झाली असली तरी निवासी भागांमध्ये ध्वनिप्रदूषण अद्यापही निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नियमांची अधिक कठोर अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित होत आहे. अंधेरी परिसरात रात्री ८ वाजता PM ‘पार्टिक्युलेट मॅटर’ २.५ ची पातळी ४२ होती, जी अवघ्या दोन तासांत तब्बल ५९७ वर पोहोचली,तर मालाडमध्ये PM २.५ चा स्तर ६०६ आणि चेंबूरमध्ये ४८० पर्यंत नोंदवला गेला. फटाक्यांच्या धुसर वातावरणामुळे मुंबईकरांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ सहन करावी लागली.

मुंबईवर धुक्याची चादर

दरम्यान फटाक्यांच्या या विषारी धुरामुळे आणि संथ वाऱ्यामुळे मुंबईवर धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असून डॉक्टरांनी नागरिकांना बाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक निरीक्षणही समोर आले आहे. गेल्या दोन दशकांत फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे.पण ध्वनीप्रदूषण नियंत्रणात येत असले तरी रात्रीच्या वेळी होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणारे वायू प्रदूषण आजही मुंबईकरांच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात केवळ जनजागृतीच नाही, तर प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची अधिक कठोर अंमलबजावणी करण्याची नितांत गरज अधोरेखित झाली आहे.

 

  • Related Posts

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकुळच्या निकालानंतर कोरम पूर्ण होत नसल्याने चार शासन नियुक्त संचालकाच्या निर्णयावरून वातावरण तापलं आहे. या निर्णयाविरोधात पुकारलेल्या आंदोलनात आंदोलक…

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    यंदा दिवाळीत फटाक्यांबाबत अनेक कडक नियमावली करून देखीव फटाके त्याच संख्येनं सर्वञ वाजवण्यात आले. माञ याचमुळे मुंबईकरांची जीवनवाहीनी असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकलसेवा विस्कळीत होय, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी…

    Leave a Reply

    You Missed

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात सतेज पाटलांचा ‘संघर्ष मोर्चा’; कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, गोकुळ वाचवण्यासाठी वकिलांचाही संघर्ष मोर्चाला पाठिंबा

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    उच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही फटाके वाजलेच कसे? फटाक्यांमुळे मुंबईचा श्वास कोंडला, लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता धोक्याची पातळीवर

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा रेल्वेला फटका! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम लोकल सेवा कोलमडली, चाकरमान्यांचे हाल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका