उधारीचे पैसे मागितले म्हणून दुकान मालकाचा हातच मोडला,महाड शहरातील घटना,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

महाडमध्ये किरकोळ उधारीवरून दुकानदाराला बेदम मारहाण, खांदा सटकला; वाचवायला गेलेल्या पत्नीचाही विनयभंग!

महाड: महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, आता एका किराणा दुकानदाराला किरकोळ उधारीच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत दुकानदाराचा हात खांद्यापासून सटकला असून, त्याच्या पत्नीशीही रस्त्यावर गैरवर्तन करून विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अरबाज अब्दुल लतिफ काझी याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, दिनांक ११ जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास फिर्यादी इजाझ मोहिदिन चिपळूणकर (रा. पानसरी मोहल्ला, महाड) हे साळीवाडा नाका येथील त्यांच्या ‘मदिना किराणा जनरल स्टोअर्स’ या दुकानात असताना, त्यांनी आरोपी अरबाज काझी याच्याकडे मागील उधारीचे पैसे मागितले. याच गोष्टीचा राग आल्याने आरोपी अरबाजने फिर्यादी यांच्या कानाखाली मारून त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्कीने बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी जबर होती की, यामध्ये दुकानदाराचा एक हात खांद्यापासून सटकला. यानंतर आरोपीने दुकानातील सामानाची नासधूस केली व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला.

या घटनेनंतर थोड्या वेळाने फिर्यादी यांच्या पत्नी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, आरोपी अरबाजने साळीवाडा नाक्याजवळ असलेल्या ‘मुफीज बर्गर कॅफे’समोरील रस्त्यावर त्यांना गाठले. तिथे त्याने फिर्यादीच्या पत्नीशी अश्लील शिवीगाळ व गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.

या संपूर्ण घटनेबाबत आरोपी अरबाज काझी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२), ११५ (२), १३१, ३५२, ३५१(२), ३५१ (३), ३२४(४), ७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गरजे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

#MahadCrime: महाडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे! किरकोळ उधारीचे पैसे मागितले म्हणून किराणा दुकानदाराला लाथाबुक्कीने बेदम मारहाण; दुकानदाराचा खांदा सटकला. धक्कादायक म्हणजे, तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या दुकानदाराच्या पत्नीचाही भररस्त्यात विनयभंग!

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अकोल्यात फर्निचरच्या कामाच्या बहाण्याने घरांमध्ये छुपे कॅमेरे; बेडरूम अन् बाथरूममधील महिलांचे खासगी क्षण रेकॉर्ड

प्रवास करताना हॉटेलमध्ये कुठे राहण्याची व्यवस्था करत असून तेव्हा नक्कीच आपण सगळेचजण आधी पाहतो ती सुरक्षा. कुठे छुपे कॅमेरे वैगरे नाही ना याची दक्षता घेऊनच आपण तिथे राहतो. पण हा…

वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

तब्बल ₹४० कोटींच्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ म्हणजे ड्रग्ज तस्करी आणि नेटवर्कशी संबंधित हाय-प्रोफाईल प्रकरणात मुख्य आरोपीला न्यायालयाकडून मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब खान याचा जामीन…

Leave a Reply

You Missed

राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?