अकोल्यात फर्निचरच्या कामाच्या बहाण्याने घरांमध्ये छुपे कॅमेरे; बेडरूम अन् बाथरूममधील महिलांचे खासगी क्षण रेकॉर्ड

प्रवास करताना हॉटेलमध्ये कुठे राहण्याची व्यवस्था करत असून तेव्हा नक्कीच आपण सगळेचजण आधी पाहतो ती सुरक्षा. कुठे छुपे कॅमेरे वैगरे नाही ना याची दक्षता घेऊनच आपण तिथे राहतो. पण हा असा काही प्रकार आपल्या घरी घडला तर… होय, अकोला शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कारपेंटरने घरांमध्ये फर्निचरचे काम करताना चक्क बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे बसवले.एवढंच नाही तर महिलांचे खासगी व्हिडीओ तयार करून लैंगिक छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.या घटनेने नागरिकांमध्ये संताप उसळला असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी या कारपेंटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रत्येक घरात त्याने छुपा कॅमेरा बसवला होता

मिळालेल्या माहितीनुसार, मोतीऊर रहेमान शेख असे आरोपीचे नाव असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. अकोल्यातील एका प्रतिष्ठित सोसायटीमध्ये मोतीऊरने घरातील कामे करण्याच कॉन्ट्रॅक्ट घेतलं. मात्र त्याच्या डोक्यात सुरु असलेल्या हैवानी कृत्याबाबत रहिवाशांना कधीच संशय आला नाही. अनेक सोसायट्यांमध्ये त्याची कामे सुरु होती. तो ज्या घराची कामे करत होता, त्या प्रत्येक घरात त्याने छुपा कॅमेरा बसवला होता. या कॅमेऱ्यामधून त्याने अनेक महिलांचे खासगी व्हिडीओ तयार केले.

व्हिडिओचा गैरफायदा घेत महिलांना धमकवलं

आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने या व्हिडिओचा गैरफायदा घेत महिलांना धमकवलं. त्यांच्यावर दबाव टाकून लैंगिक छळ करण्यात आले. अकोल्यातील एका प्रतिष्ठित सोसायटीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी संबंधित कारपेंटरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीकडील दोन मोबाइल जप्त केले असून, त्यामध्ये महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आढळली आहे. काही व्हिडीओमध्ये पती-पत्नीच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण असल्याची माहितीही मिळत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण केली.

पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमधील व्हिडीओ, फोटो आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू केली

प्राथमिक तपासात चार महिला आणि एका २२ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका ३० वर्षीय महिलेने जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमधील व्हिडीओ, फोटो आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे. आरोपीने अशाच पद्धतीने आणखी किती महिलांचे व्हिडीओ तयार केले आहेत, तसेच त्यांचा धमकावून किंवा दबाव टाकून छळ केला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. छुप्या कॅमेऱ्यांचा प्रकार समोर आल्यानंतर सोसायटी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू