
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे बऱ्याच प्रसिद्ध हॉटेल, खाद्यपदार्थांचे स्टॉल, मिठाईचे दुकान सर्वांचेच सत्य आणि ग्राहकांची होत असलेली फसवणूक समोर आली अन् सर्वच आता सतर्क झाले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाया आजही सुरुच आहेत.यातून भेसळखोरांची सुटका नाही हे नक्की. यातच आता पुण्यातील मिठाई व्यावसायिकांकडे एफडीएने आपला मोर्चा वळवला आहे. थेट अर्धा टन मिठाई नष्ट करण्यात आली.
बुधवार पेठ परिसरातील प्रसिद्ध मिठाई व्यावसायिकांवर एफडीकडून कारवाई
बुधवार पेठ परिसरातील प्रसिद्ध मिठाई व्यावसायिकांवर एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली. अस्वच्छता, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आठ व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. त्यात आढळून आले की, काहींकडे परवानेच नसताना त्यांच्याकडून मिठाईची विक्री केली जात आहे. एफडीएने तब्बल 512.1 किलो मिठाई जप्त करण्यात आली. एफडीएने तब्बल 2 लाख 88 हजार 200 रूपयांची मिठाई नष्ट केली. ही मिठाई नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आली. 8 पथकांकडून ही मोहिम राबवण्यात आली. ज्यात ही कारवाई झाली.
पेठेतील मिठाईची दुकाने आणि उत्पादन केंद्रांची तपासणी केली. यादरम्यान, काही आस्थापनांमधील मिठाई बनवण्याची जागा अस्वच्छ असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर, आवश्यक परवाना आणि नोंदणीशिवाय व्यवसाय करण्याची प्रकरणेही उघडकीस आली.
अस्वच्छ परिस्थितीत मिठाई तयार केली जात होती
यामध्ये परवाना नसताना अनेक मिठाईवाल्या दुकानदारांकडून मिठाईची विक्री केली जात होती. यात थेट व्यवसाय बंद करण्याची नोटीस मंगल मूर्तीला मिठाई सेंटरला बजावण्यात आली. श्री मंगलमूर्ती यांच्या आस्थापनातही अस्वच्छ परिस्थितीत मिठाई तयार केली जात होती. या कारवाईत अनेक प्रकारच्या मिठाई होत्या. त्यातच खव्याचे मोदक, मोतीचूर लाडू, विविध दुग्धजन्य पदार्थ याचा समावेश होता. बेसनाचे लाडूही आढळून आली. पदार्थांचे 17 नमुने घेण्यात आली. यापैकी काही प्रसिद्ध अशी मिठाई सेंटर आहेत.
१ लाख १८ हजार ८० रुपये किमतीची २१५.१ किलो मिठाई जप्त
झोन-६ च्या पथकाने श्रीमंत पेढेवाले यांच्या आस्थापनातून १ लाख १८ हजार ८० रुपये किमतीची २१५.१ किलो मिठाई जप्त केली. येथील उत्पादन स्थळ अस्वच्छ असल्याचे आढळून आले. पथकाने मोतीचूर लाडू, खावा मोदक आणि उकडी मोदक यांचे नमुने घेतले. धारवाडी पेढा स्वीट्स अँड स्नॅक्समधून २३,८४० रुपये किमतीची ४३ किलो मिठाई जप्त करण्यात आली. येथेही अस्वच्छ परिस्थिती आढळल्याने मोतीचूर लाडू, खावा मोदक आणि उकडी मोदक यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्रावर नोंदणी प्रमाणपत्राशिवाय चालवले जात असल्याचे स्पष्ट झाले.हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र नोंदणी प्रमाणपत्राशिवाय कार्यरत असल्याचे आढळून आले. ३० नोव्हेंबर रोजी तडजोडीसाठी अर्ज दाखल केला जाईल. श्री कृपा डेअरीमधून मलई मोदक पेढा, केशरी मोदक पेढा, कांडी मोदक पेढा आणि मोकळ्या म्हशीच्या दुधाचे नमुने घेण्यात आले.
एकंदरीतच एफडीएच्या पुण्यातील या धडक कारवायांमुळे मोठी खळबळ उडाली असून सर्वच मिठाई विक्रेत्यांचा धाबे चांगलेच दणाणले आहेत.








