बालविवाह रोखण्यासाठी मुंबई पोलीस अलर्टमोडवर! तात्काळ १०९८ वर कॉल करण्याचं आवाहन; ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत विशेष कार्यशाळा संपन्न

संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केलेल्या ‘बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनाचे’ औचित्य साधून आणि केंद्र शासनाच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात सामूहिक बालविवाह प्रतिबंध शपथ आणि स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. भरुचा हॉल, पोलीस आयुक्त आवार येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व ‘होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालस्नेही महाराष्ट्र अभियान’ क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेदरम्यान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन यांच्या वतीने ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

वरिष्ठ पोलीस अधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमप्रसंगी महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस उप आयुक्त श्रीमती शीला साईल, विशेष बाल पोलीस कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन फणदार, महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली सरवदे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर उपस्थित होते. तसेच ‘होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशन’च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केलीलोना, मुख्य संचालन अधिकारी श्री. शकील शेख, प्रोग्रॅम मॅनेजर ॲड. परम आनंद, मॅनेजर श्री. सचिन करजुले आणि असिस्टंट मॅनेजर श्री. वसिम शेख यांनीही सहभाग नोंदवला.

पोलीस अधिकाऱ्यांचा ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्रा’चा संकल्प

या एकदिवसीय कार्यशाळेत मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांचे बाल कल्याण पोलीस अधिकारी, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ सदस्य, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सर्व मान्यवर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी “महाराष्ट्र राज्य बालविवाह मुक्त करण्याचा” संकल्प करत सामूहिक शपथ घेतली आणि स्वाक्षरी फलकावर स्वाक्षऱ्या करून मोहिमेला आपला पाठिंबा दर्शविला.

चाईल्ड हेल्पलाईन १०९८ आणि कायद्याबाबत जनजागृती

कार्यक्रमाच्या ठिकाणी चोवीस तास मोफत आपत्कालीन सेवा देणाऱ्या ‘चाईल्ड हेल्पलाईन १०९८’ ची कार्यपद्धती आणि ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६’ बाबत माहिती देणारे फलक प्रदर्शित करून जनजागृती करण्यात आली. समाजात कोठेही बालविवाह होत असल्यास किंवा संकटात सापडलेले बालक आढळल्यास नागरिकांनी कोणताही विलंब न करता तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    मृतदेह जाळण्याऐवजी दफन करून शिवलिंग ठेवले जाते,पिंडदानही नाही! लिंगायत स्वतःला हिंदू मानत नाहीत? अशीही अंत्यसंस्काराची पद्धत

    भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरेत विविध पंथ, संप्रदाय आणि समाजघटकांच्या रूढी-परंपरांमध्ये मोठे वैविध्य पाहायला मिळते. सामान्यतः हिंदू धर्मात मृत्यूनंतर ‘अग्निदाह’ (दहन) करण्याची पद्धत प्रचलित असली, तरी एका समाजात मृतदेह जाळण्याऐवजी…

    मुंबईकरांनो लक्ष द्या! ७५ दिवसांचा मेगा ब्लॉक; एसी लोकलसह अनेक गाड्या रद्द, एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलले

    मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खास करून पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती आहे. कारण पश्चिम रेल्वेवर तब्बल 75 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकलच्या वेळापञकात…

    Leave a Reply

    You Missed

    मृतदेह जाळण्याऐवजी दफन करून शिवलिंग ठेवले जाते,पिंडदानही नाही! लिंगायत स्वतःला हिंदू मानत नाहीत? अशीही अंत्यसंस्काराची पद्धत

    मृतदेह जाळण्याऐवजी दफन करून शिवलिंग ठेवले जाते,पिंडदानही नाही! लिंगायत स्वतःला हिंदू मानत नाहीत? अशीही अंत्यसंस्काराची पद्धत

    बालविवाह रोखण्यासाठी मुंबई पोलीस अलर्टमोडवर! तात्काळ १०९८ वर कॉल करण्याचं आवाहन; ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत विशेष कार्यशाळा संपन्न

    बालविवाह रोखण्यासाठी मुंबई पोलीस अलर्टमोडवर! तात्काळ १०९८ वर कॉल करण्याचं आवाहन; ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत विशेष कार्यशाळा संपन्न

    मुंबईकरांनो लक्ष द्या! ७५ दिवसांचा मेगा ब्लॉक; एसी लोकलसह अनेक गाड्या रद्द, एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलले

    मुंबईकरांनो लक्ष द्या! ७५ दिवसांचा मेगा ब्लॉक; एसी लोकलसह अनेक गाड्या रद्द, एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलले

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा भाजपसमोर हात पुढे केला? दोन राष्ट्रवादी गटांचे राजकारण, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि घराणेशाहीचा प्रश्न

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा भाजपसमोर हात पुढे केला? दोन राष्ट्रवादी गटांचे राजकारण, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि घराणेशाहीचा प्रश्न

    तुकाराम मुंढेंचा पुण्यात मोठा दणका! बुधवार पेठेतील प्रसिद्ध मिठाई दुकानांवर धाडी; ५१२ किलो अस्वच्छ मिठाई नष्ट, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

    तुकाराम मुंढेंचा पुण्यात मोठा दणका! बुधवार पेठेतील प्रसिद्ध मिठाई दुकानांवर धाडी; ५१२ किलो अस्वच्छ मिठाई नष्ट, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

    डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

    डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

    तिरुपती बालाजी चरणी चक्क १६० कोटींचे सोने दान! चेन्नईच्या भक्ताने दिले १२१ किलो सोन्याचे दागिने अन् मुकुट

    तिरुपती बालाजी चरणी चक्क १६० कोटींचे सोने दान! चेन्नईच्या भक्ताने दिले १२१ किलो सोन्याचे दागिने अन् मुकुट

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?