चर्चगेट येथील ‘Income Tax’ च्या ऑफिसला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल,अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या समोर असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.इमारतीच्या तळ मजल्यावर ही आग लागली असून, घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे.

चर्चगेट येथील ‘Income Tax’ च्या ऑफिसला भीषण आ

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या चर्चगेट स्टेशनजवळील आयकर विभागाच्या म्हणजे इन्कम टॅक्स कार्यालयात अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी लागलेल्या या आगीमुळे इमारतीतून काळ्या धुराचे मोठमोठे लोट बाहेर पडू लागले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पोलीस ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी दुपारी चर्चगेट येथील आयकर भवनाच्या बेसमेंटमधील रूम नंबर १० मध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. सुरुवातीला वायर जळण्याचा उग्र वास आला आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं आहे. आग लागल्याचे समजताच इमारतीत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड धावपळ उडाली. सुदैवाने बहुतांश कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.

बेसमेंटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानंतर धुराचे साम्राज्य पसरले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, प्रथम वायर जळल्याचा वास आला आणि धूर दिसू लागला. आगीचा भडका उडाल्याने सर्वजण बाहेर पळाले. आगीची तीव्रता जास्त असली तरी सुदैवाने ती वरच्या मजल्यांवर पसरली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

रेस्क्यू ऑपरेशन सुरू 

आग लागल्यानंतर इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर काही नागरिक घाबरून अडकून पडले होते. यात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य नागरिकांचाही समावेश असल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शिड्यांच्या साहाय्याने इमारतीत अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अग्निशमन दलाच्या ८ गाड्या, पाण्याचे टँकर्स घटनास्थळी

अग्निशमन दलाच्या ८ गाड्या, पाण्याचे टँकर्स आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा घटनास्थळी हजर आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने आयकर भवनाभोवतीचा परिसर सील केला असून वाहतूक व गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा कोणी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, इमारतीतील महत्त्वाच्या कागदपत्रांचे आणि साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच