नवी मुंबई : सन.. आयलाय.. गो.. आयलाय. गो नारली पूनवंचा.. मन आनंद माव ना.. कोल्यांच्या दुनियेला…या गाण्याचा ताल धरीत अवधा मुंबई रायगड आणि पालघर पूर्ण कोळीवाडा आज सजला आहे . नियमाप्रमाने १ ऑगस्ट पासून मासेमारी ला सुरुवात होतेय , नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केल्यावर त्याला नारळ वाहिल्यानंतर समुद्र शांत होतो , मासेमारी करायला गेलेल्या बांधवाचे रक्षण होतेय अशी समज कोळी समाज ठेवतात .
महाराष्ट्राला ७२० किलोचा समुद्र लाभला गोव्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे व पालघर पर्यंत समुद्र पसरलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोळी समाजाचे वास्तव्य आहे.आजच्या दिवशी आलीबाग पनवेल, नवी मुंबई,पालाघर , आशय अनेक ठिकाणी वाजत गाजत मिरवणूक निघतेय. मिरवणूकीला सहभागी झालेल्या कोळी महिलांचे व पुरुषांचे पेहराव पाहण्याजोगे असतात हा सण पाहण्यासाठी कोळीवाड्यांमध्ये इतर नागरीकांची मोठी गर्दी होते.नारळाची पूजा करुन सोन्याच्या रंगाचे पाणी चढवलेले आणि सजावट केलेले नारळ होडीद्वारे दर्याला वाहिले जाते.









