जगदीप धनखड आहेत कुठे?

मुंबई- सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे जगदीप धनखड आहेत कुठे? देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड २१ जुलैला तब्येतीचं कारण देत अचानक पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. धनखड यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं, असा दावाही विरोधी नेत्यांकडून करण्यात आला. राजीनामा दिल्यानंतर धनखड नेमके आहेत कुठे हा प्रश्न विचारला जातोय. कपिल सिब्बल यांनी यावरून थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उत्तर मागितलंय. वेळ आली तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल, असा इशाराच सिब्बल यांनी दिलाय. धनखड हे भाजपाचे वरिष्ठ नेते, मोदींचे जवळचे आणि भाजपाचा जाट चेहरा अशी त्यांची ओळख.
धनखड राजीनामा दिल्यानंतर सार्वजनिक रित्या कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. मात्र या मुद्द्याची सुरुवात केली ते कपिल सिब्बल यांनी राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक बेपत्ता होण्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावे अशी मागणी केली.अन्यथा धनखड यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यास भाग पडेल.यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.हेबियस कॉर्पस हा एक कायदेशीर मार्ग आहे जो व्यक्तींना बेकायदेशीर अटक किंवा तुरुंगवासाला न्यायालयात तक्रार करून आव्हान देण्यास सक्षम करतो.कपिल सिब्बल यांच्यापाठोपाठ संजय राऊतांनीसुद्धा यावरून सवाल उपस्थित केलाय. जगदीप धनखड यांच्या अचानक गायब होण्याबाबत आता हळूहळू विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय. मात्र अद्यापही सरकारकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून धनखड यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीय . त्यामुळे नेमके धनखड कुठे आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे

  • Related Posts

    ‘मातोश्री’वर बंधूप्रेम

    मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होतेय. कुणी या साहेबांसोबत जातंय तर कुणी त्या साहेबांसोबत. त्यामुळे आज अमुक अमुक पक्षासोबत असलेला नेता किंवा पदाधिकारी उद्या कोणत्या पक्षात असेल…

    केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

    मुंबई- अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय. आता पुन्हा एकदा केतकीने मराठी-हिंदी वादात विनाकारण उडी घेतल्याचं दिसतंय. केतकीने मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठीला अभिजात दर्जा हवाच…

    Leave a Reply

    You Missed

    जगदीप धनखड आहेत कुठे?

    जगदीप धनखड आहेत कुठे?

    नारळी पौर्णिमा:

    नारळी पौर्णिमा:

    डोंबिवलीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी समाधी सोहळा

    डोंबिवलीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी समाधी सोहळा

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    ‘मातोश्री’वर बंधूप्रेम

    ‘मातोश्री’वर बंधूप्रेम

    केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

    केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

    गुन्हा मागे, भाजपात एंट्री

    गुन्हा मागे, भाजपात एंट्री

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!