अंधेरी पश्चिमेत “आरती संग्रह” चे प्रकाशन – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, शरद जाधव यांचा उपक्रम : गणेश भक्तांसाठी आरती संग्रह व पूजेचे साहित्य वाटप

अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभाग प्रमुख व माजी रत्नागिरी जिल्हा समन्वयक शरद जाधव यांच्या संकल्पनेतून गणेश भक्तांसाठी “आरती संग्रह” तयार करण्यात आला असून त्याचे प्रकाशन शिवसेना नेते, आमदार व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवनात पार पडले.

या प्रसंगी आदित्य ठाकरे यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा देत शरद जाधव यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. अंधेरी विधानसभेत घरोघरी या आरती संग्रहाचे वाटप करण्यात येणार असून भक्तांसाठी पूजेचे साहित्यही उपलब्ध करून दिले जात आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

उद्घाटन सोहळ्याला मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभाग प्रमुख शरद जाधव, श्रीमती उल्का विश्वासराव (उपजिल्हा महिला संघटीका-रत्नागिरी), प्रकाश पांचाळ (लांजा तालुका सचिव) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शरद जाधव यांच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन होत असून गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • Related Posts

    दक्षिण अमेरिका भूकंपाने हादरली

    दक्षिण अमेरिकेतील ड्रेक पॅसेजमध्ये भूकंप झाला. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नंतर यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने त्याची तीव्रता ७.५ इतकी मोजली. हा भूकंपड्रेक पॅसेजमध्ये १० किमी खोलीवर…

    कबुतरखान्याचा वाद चिघळला :

    कबुतरखान्याचा वाद अधिकच चिघळताना दिसतोय.जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केल्यानंतर आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं कबुतरखाना परिसरात आंदोलन केलं. मात्र, गोवर्धन देशमुख यांनी दादर कबुतरखान्याच्या परिसरात पाऊल ठेवताच पोलिसांच्या एका…

    Leave a Reply

    You Missed

    दक्षिण अमेरिका भूकंपाने हादरली

    दक्षिण अमेरिका भूकंपाने हादरली

    अंधेरी पश्चिमेत “आरती संग्रह” चे प्रकाशन – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, शरद जाधव यांचा उपक्रम : गणेश भक्तांसाठी आरती संग्रह व पूजेचे साहित्य वाटप

    अंधेरी पश्चिमेत “आरती संग्रह” चे प्रकाशन – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, शरद जाधव यांचा उपक्रम : गणेश भक्तांसाठी आरती संग्रह व पूजेचे साहित्य वाटप

    विश्वविक्रम रचण्याची शर्यत

    विश्वविक्रम रचण्याची शर्यत

    कबुतरखान्याचा वाद चिघळला :

    जगदीप धनखड आहेत कुठे?

    जगदीप धनखड आहेत कुठे?

    नारळी पौर्णिमा:

    नारळी पौर्णिमा:

    डोंबिवलीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी समाधी सोहळा

    डोंबिवलीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी समाधी सोहळा

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    ‘मातोश्री’वर बंधूप्रेम

    ‘मातोश्री’वर बंधूप्रेम