मुंबई / प्रतिनिधी:
नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती (MMKS) यांच्या संयुक्त विद्यमाने “कोस्टल राईट अॅक्ट (CRA)” या कायद्यानुसार मच्छिमार समुदायाच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ८ व ९ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत होणार असून, ठाणे (उत्तन), सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांतील मच्छिमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
कार्यशाळेत सहभागी प्रतिनिधींना प्रवास व निवासाची सुविधा आयोजकांकडून दिली जाणार असून, कार्यक्रमात कोस्टल राईट अॅक्टच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल अशी माहिती किरण कोळी सरचिटणीस महाराष्ट्र कृती समिती यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे..








