मत्स्य विभागात ‘डिझेल घोटाळा’ आणि ‘बेकायदा मासेमारी’चे रॅकेट? वरिष्ठ अधिकारीही रडारवर!-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या फिशरमन काँग्रेसचा खळबळजनक आरोप

मुंबई: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसने राज्यातील मत्स्य विभागात बेकायदा पर्ससीन-एलईडी मासेमारी, शासनाच्या अनुदानित डिझेलचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, आणि अधिकाऱ्यांचा गंभीर भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यासंदर्भात फिशरमन काँग्रेसचे मुख्य समन्वयक मिल्टन सौदिया यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आणि विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांना दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी एक सविस्तर पत्र पाठवून त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

कोट्यवधींचा डिझेल घोटाळा आणि बेकायदा मासेमारी

फिशरमन काँग्रेसने त्यांच्या पत्रात स्पष्ट केले आहे की, मत्स्य विभागातील अधिकारी कायदा आणि नियम यांचे उल्लंघन करून प्रतिबंधित पर्ससीन आणि एलईडी यांसारख्या विध्वंसक मासेमारीसाठी शासनाचा डिझेल कोटा मंजूर करतात. यामुळे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे. हे अधिकारी वर्षानुवर्षे बेमालुमपणे कायद्याला बगल देऊन शासनाची आर्थिक फसवणूक करत असून केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे.
‘सागर सुरक्षा’ धोक्यात; राष्ट्रविरोधी शक्तींच्या प्रवेशाची भीती
या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे बनावट कागदपत्रांचा गैरवापर करून राष्ट्रविरोधी शक्ती आपल्या सागरी हद्दीत प्रवेश करू शकतात, अशी गंभीर भीती फिशरमन काँग्रेसने व्यक्त केली आहे. खोट्या कागदपत्रांद्वारे मच्छिमार बोट किंवा ओळखपत्र मिळवून सागरी सीमेमध्ये बेकायदेशीर हालचाली करणे हे भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि राष्ट्रीय सुरक्षा तथा सागरी सुरक्षा कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे असल्याचे पत्रात नमूद केले आहे. तरीही उपसचिव, मत्स्य आयुक्त, सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि परवाना अधिकारी यांच्या अशा गुन्हेगारी स्वरुपाच्या अपकृतींकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल पत्रात खेद व्यक्त करण्यात आला आहे.

आयुक्तांनीच केले नियमांचे उल्लंघन?

माजी मत्स्य आयुक्त  किशोर तावडे यांनी दि. १२ मे २०२५ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी करंजा बंदरात जाऊन पर्ससीन आणि एलईडी स्वरुपाची विध्वंसक मासेमारी करणाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संवाद साधला आणि त्यांच्या बोटींमध्ये जाऊन मासेमारीची माहिती घेतली, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे. बेकायदा मासेमारीची यंत्रणा बोटीवर दिसत असतानाही आयुक्तांनी कायद्यानुसार ‘स्यू मोटो’ कारवाई केली नाही. त्यांच्या या कृतीमुळे मत्स्य खात्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा विनासायास सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे फिशरमन काँग्रेसने म्हटले आहे.

लाचखोरी प्रकरणातील अधिकाऱ्यांवर आरोपपत्र नाही

दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी लाच घेताना रंगेहात पकडलेल्या दोन मत्स्य अधिकारी – सहाय्यक आयुक्त  पुलकेश कदम आणि परवाना अधिकारी  नीरज चासकर (मुंबई) – यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी, आजपर्यंत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १९८ अन्वये मा. न्यायालयात आरोपपत्र (Charge-sheet) दाखल झालेले नाही, अशी धक्कादायक माहिती पत्रातून समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संरक्षण आणि आर्थिक व्यवहारांमुळे या प्रकरणात अनावश्यक विलंब लावला जात असल्याचे फिशरमन काँग्रेसने म्हटले आहे.
फिशरमन काँग्रेसने दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक . संजीव कुमार सिंघल (आयपीएस) यांची भेट घेतल्याचेही नमूद केले आहे.

विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची मागणी

वाढती लाचखोरी, भ्रष्टाचार आणि देशाची सागरी सुरक्षा लक्षात घेऊन पर्ससीन मासेमारीची विशेष तपास पथक (SIT) नेमून चौकशी करण्याची मागणी फिशरमन काँग्रेसने केली आहे. पत्रावर त्वरित दखल न घेतल्यास पत्रकार परिषदा तथा उपोषण आदी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही पत्राच्या शेवटी देण्यात आला आहे.
या गंभीर आरोपांवर मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडून तसेच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते याकडे आता मच्छिमार बांधवांचे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    IAS Kalpana Bhagwat Crime Case: छत्रपती संभाजीनगरातील फेक IASचा मोठा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत हिने केलेल्या महाघोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. IAS Kalpana…

    मुंबईत खळबळ! १५ लाखांच्या लाच प्रकरणी न्यायाधीश, लिपिक अडकले

    मुंबई: मुंबईतील (Mumbai) एका व्यावसायिक दाव्यात (Commercial Suit) ‘अनुकूल निकाल’ (Favourable Order) देण्याच्या मोबदल्यात कथितरित्या १५ लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारल्याप्रकरणी, माझगाव दिवाणी आणि सत्र न्यायालयाचे (Mazagaon Civil & Sessions…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू