अखेर राज्यातील नागरिकांची गेल्या चार वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे.
महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
तर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे राज्याच्या राजकारणाला वेग येणार असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे.
महापालिकांच्या माध्यमातून स्थानिक विकासाची दिशा ठरणार असल्याने, या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकांमुळे मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.









