मुंबईत CNG तुटवडा तीव्र – नागरिकांची दमछाक, ऑटो-टॅक्सी चालकांचे मनमानी दर; कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा?

मुंबईसह संपूर्ण राज्यात CNG Maharashtra CNG crisis नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य गॅस पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे गेल दोन दिवसांपासून पुरवठा बाधित असून मुंबई आणि ठाण्यातील CNG पंपांवर सलग दुसऱ्या दिवशीही लांबलचक रांगा दिसत आहेत. अनेक पंपांवर पुरवठा थांबल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

ऑफिसच्या वेळेत नागरिकांची दमछाक

सकाळची ऑफिसची वेळ… त्यात CNG तुटवडा… आणि यामुळे ऑटो व टॅक्सी मिळणे अक्षरशः कठीण  झाले आहे.
जिथे पहाल तिथे “ऑटो कुठे? टॅक्सी कुठे?” अशी आरडाओरड सुरू आहे.

शालेय वाहतूक, कार्यालयीन प्रवासी, महिला, वृद्ध — सर्वांनाच या गोंधळाचा मोठा फटका बसत आहे.ऑटो–टॅक्सी चालकांचे मनमानी दर : 20–30 रुपये जास्त मागणी

पुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक ऑटो व टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून 20 ते 30 रुपये जादा घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

अनेक ठिकाणी चालक उघडपणे सांगत आहेत—

“CNG नाही… पेट्रोलवर गाडी चालवतोय… जादा पैसे द्या नाहीतर पुढे जा!”

प्रवाशांचा प्रश्न अगदी रास्त आहे की —मिटर रेट 25 रुपयांपेक्षा जास्त पेट्रोलसाठी असतो का? की तो CNG वर चालणाऱ्या गाड्यांसाठी असतो?

नागरिक या मनमानीला बळी पडत आहेत, कारण ऑटो-टॅक्सी मिळणंही अवघड झालं आहे.

पोलीसही मूक? निर्मात्याचा धक्कादायक अनुभव एका मराठी निर्मात्याने “नाव न सांगण्याच्या अटीवर” सांगितलेला प्रसंग तर अधिक गंभीर आहे.
त्यांनी एका चालकाला जादा भाड्यावरून प्रश्न विचारताच… आणि “चल, पोलिसांकडे तक्रार करू” असे म्हणताच…चालक म्हणाला — ‘हो चला!’हा आत्मविश्वास कसा?निर्माते सांगतात— “पोलिसांनी त्याला बसवले… काही क्षणात सोडूनही दिले. त्यांना माहिती आहे की ‘आपलेच सहकारी आहेत’.”

या घटनेमुळे नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेवरचा विश्वास धक्का बसत असून कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह  उभे राहिले आहे.

सरकारचे नियंत्रण सुटले का?

CNG तुटवडा — ऑटो-टॅक्सींची मनमानी — पोलिसांची दुर्लक्ष — नागरीकांचे वाढते हाल…
या सर्वातून व्यवस्थेचे नियंत्रण ढासळल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

वाहतूक, इंधन, सार्वजनिक सेवा, नागरिकांचे दैनंदिन आयुष्य आणि सुरक्षितता — सगळेच प्रश्नचिन्हाखाली.

नागरिक विचारत आहेत—

“सरकार कुठे आहे?”

“व्यवस्था चालवणारा कुठे झोपला आहे?”
“जादा पैसे देणे बंधनकारक आहे का?”

लोकांचे मत स्पष्ट आहे —
या परिस्थितीने सरकारने व्यवस्थेवरील पकड गमावली आहे.
नागरिकांचा विश्वास हादरला आहे.

सध्याची परिस्थिती

 राज्यभरात CNG पुरवठा खंडित

पंपांवर 1 ते 2 किमी लांबीच्या रांगा

ऑटो-टॅक्सी चालक उघडपणे जादा रक्कम मागत आहेत

 प्रवाशांशी वाद, असुरक्षितता वाढ

पोलिस कारवाईचे नाव नाही

 नागरिक, विद्यार्थी, ऑफिस कर्मचारी अडचणीत

 आणीबाणीच्या सेवांनाही फटक

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

खरकटी भांड्यांत हरवलेलं बालपण…. ज्या वयात त्याच्या हातात भविष्याची स्वप्नं, पुस्तकं आणि खेळण्याचं साहित्य असायला हवं होतं, त्या हातात जेवण झाल्यानंतर उरलेली खरकटी भांडी होती. एका हातात कापड होतं आणि…

शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

अकोल्यातील शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तब्बल 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून 65 शिक्षकांची वेतनवाढ थांबवण्यात आली.अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गाजलेल्या बहुचर्चित…

Leave a Reply

You Missed

कर्जतनंतर आता नाशिकच्या चिमुकल्यांची कमाल! पाण्याच्या बॉटलचा माईक अन् रस्त्याच्या खड्ड्यांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’, व्हिडिओ व्हायरल

कर्जतनंतर आता नाशिकच्या चिमुकल्यांची कमाल! पाण्याच्या बॉटलचा माईक अन् रस्त्याच्या खड्ड्यांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’, व्हिडिओ व्हायरल

मुंबई-पुणे प्रवास करणार आहात? मग आधी ही बातमी वाचा, 12 ऑगस्टला मिसिंग लिंक बंद; काय आहे कारण ?

मुंबई-पुणे प्रवास करणार आहात? मग आधी ही बातमी वाचा, 12 ऑगस्टला मिसिंग लिंक बंद; काय आहे कारण ?

छत्रीचा माईक अन् व्हायरल व्हिडिओचा इम्पॅक्ट! कर्जतच्या शाळकरी मुलींच्या ‘ग्राऊंड रिपोर्ट’मुळे काही तासांत रस्ता दुरूस्त, खड्डे बुजवले; नेटकऱ्यांकडून कौतुक

छत्रीचा माईक अन् व्हायरल व्हिडिओचा इम्पॅक्ट! कर्जतच्या शाळकरी मुलींच्या ‘ग्राऊंड रिपोर्ट’मुळे काही तासांत रस्ता दुरूस्त, खड्डे बुजवले; नेटकऱ्यांकडून कौतुक

महिलांना प्रशासकीय मार्गदर्शन अन् सायबर सुरक्षेचे धडे! श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे ‘दिशा महिला प्रभाग संघा’च्या वार्षिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांना प्रशासकीय मार्गदर्शन अन् सायबर सुरक्षेचे धडे! श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे ‘दिशा महिला प्रभाग संघा’च्या वार्षिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

तब्बल 17 राज्यांना तुफान पावसाचा इशारा! मुंबईलाही हाय अलर्ट; पुढील 24 तास का सांगितले महत्त्वाचे?

तब्बल 17 राज्यांना तुफान पावसाचा इशारा! मुंबईलाही हाय अलर्ट; पुढील 24 तास का सांगितले महत्त्वाचे?

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच! ब्लिंकिटच्या गोदामावर FDA ची धाड, झुरळांचा वावर अन्…अधिकारीही चक्रवाले

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच! ब्लिंकिटच्या गोदामावर FDA ची धाड, झुरळांचा वावर अन्…अधिकारीही चक्रवाले

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती