मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

भष्टाचार प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतोय. मग ती कोणती नोकरी असो किंवा कोणती परीक्षा. घोटाळेबाज सगळीकडेच असतात. पण नेहमी इतरांचे घोटाळे आणि गुन्हे उघडकीस आणणारेच घोटाळेबाज निघाले तर. होय, मुंबई पोलिस दलातच तब्बल साडेसहा कोटींचा घोटाळा झाला आहे.पोलिसांचे वेतन म्हणजे पगार काढणाऱ्या मंत्रालयीन लिपिक आणि अधिकाऱ्यांनीच शासनाच्या तब्बल साडेसहा कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात ५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटाळा झाला कसा?

पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा डेटा जुन्या ‘सेवार्थ’ प्रणालीतून नव्या प्रणालीत म्हणजे एका सिस्टममधून दुसऱ्या सिस्टममध्ये ट्रान्सफर करताना या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयात पोलिसांचे पगार काढण्याचे काम चालते. येथील मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी जे लोक पोलिस दलातच नाहीत, अशा ८ ते १० बोगस व्यक्तींना ‘पोलिस कर्मचारी’ म्हणून दाखवले. केवळ इतकेच नाही, तर त्यांच्या नावावर बँक खाती उघडून शासनाकडून त्यांचे नियमित पगारही काढले.

ऑडिटमुळे चोरी समोर 

या सर्व प्रकाराबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचे ऑडिट केले. या ऑडिटमध्ये पगाराच्या रकमेत मोठी तफावत आढळली. ज्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये पगारापोटी जमा झाले, त्यांची नावे तपासली असता ते कोणीही पोलिस दलात कार्यरत नसल्याचच समोर आलं.

या बोगस पोलिसांच्या नावे काढण्यात आला पगार

घोटाळा करणाऱ्या पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या नावांवरून हे पगार काढले जात होते. हे लोक नेमके कोण आहेत आणि त्यांचे या अधिकाऱ्यांशी काय संबंध आहेत, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

या पाच पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

उत्तर प्रादेशिक विभागातील पोलिस निरीक्षकांच्या तक्रारीवरून समतानगर पोलिस ठाण्यात फसवणूक, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, प्रमुख लिपिक अजय राठोड, आणि वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम या ५ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

Leave a Reply

You Missed

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार