हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

मुखदर्शन असो वा चरणस्पर्श, ‘नवसाला पावणारा’ म्हणून ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक लालबाग-परळच्या गल्लीबोळात दाखल होत असतात. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक तासनतास, अगदी दिवस-दिवस रांगेत उभे राहतात. मात्र, लालबागच्या राजाच्या मंडपात दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वसामान्य भाविकांना पुन्हा एकदा धक्काबुक्की, फरफट आणि अपमानच आल्याचे विदारक अनुभव अनुभवायला मिळाला आहे. तर, दुसरीकडे मात्र VIP लोक, राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींसाठी रेड कार्पेट अंथरून त्यांना अगदी सोयीचं दर्शन देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हीआयपींना रेड कार्पेट, सामान्यांना तुडवण्याची वेळ

सोशल मीडियावर सध्या लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यानचे काही संतापजनक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. बॅरीगेड ओलांडून बाप्पाच्या दर्शनासाठी जाणारी भाविकांची प्रचंड गर्दी अक्षरशः एकमेकांना तुडवत पुढे सरकताना दिसत आहे. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे हाल होत आहेत.

एकीकडे उद्योगपती, बॉलीवूड अभिनेते, क्रिकेटपटू आणि बडे राजकीय नेते बाप्पाच्या चरणी सावकाश बसून, चरणस्पर्श करत विविध अँगलने फोटो काढताना दिसतात. तर दुसरीकडे, तासनतास रांगेत उभे राहून बाप्पाच्या जवळ पोहोचणाऱ्या सर्वसामान्य भक्ताला दर्शनासाठी सेकंदभरही उभे राहू न देता कार्यकर्ते थेट कॉलर, कपडे किंवा हात धरून पुढे ढकलून देत आहेत.

पोलिसांची मुजोरी आणि कार्यकर्त्यांची दादागिरी

यंदा लालबागच्या राजाच्या मंडपात केवळ भाविकांचीच नव्हे, तर माध्यमांचीही अडवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. अधिकृत ओळखपत्र असलेल्या पत्रकारांना वृत्त संकलनापासून रोखत पोलिसांनी मुजोरी दाखवल्याचे आरोप झाले आहेत. त्यातच एका धक्कादायक घटनेने सुरक्षेचा आणि कार्यकर्त्यांच्या दादागिरीचा प्रश्न उपस्थित केला आहे. दर्शनासाठी बनावट ओळखपत्र वापरणाऱ्या एका भाविकाला पकडल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच अक्षरशः गुन्हेगारासारखी बेदम मारहाण केली. कायद्याचा बडगा स्वतःच्या हातात घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या या मुजोरीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बनावट ओळखपत्रे अन् चोरीच्या घटनांनी गोंधळ

दरवर्षीप्रमाणे यंदाही व्हीआयपी पासेस, बनावट ओळखपत्रांचा सुटलेला सुळसुळाट, महिला भाविकांना होणारी धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीसदृश परिस्थितीमुळे लालबागच्या राजाची ‘व्हीआयपी संस्कृती’ पुन्हा एकदा तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतप्त सूर

दर्शनाच्या नावाखाली होणारी मोबाईल चोरी, पाकिटमारी, तासनतास रांगेत उभे राहून होणारी पायपीट आणि उकाड्याने चक्कर येऊन पडणाऱ्या भाविकांचे हाल पाहता, “अशा अव्यवस्थेत आणि अपमानात रांगेत उभे राहण्यापेक्षा आपल्या घरीच बाप्पाची मनोभावे आरती करा आणि पाया पडा,” असा संतप्त सूर आता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या एकाच नावाचा आणि एकाच दौऱ्याचा दबदबा पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड लोकसभा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांचा.…

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडनचा यशस्वी दौरा आटोपून मुंबईत परतले. माञ आता त्या प्रवासातील एका प्रसंगाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. तो प्रसंग म्हणजे मुंबईला येताना ब्रिटिश एअरवेजच्या विमानातच एकनाथ…

    Leave a Reply

    You Missed

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब